कर्जत/प्रतिनिधी दि.१५
उपविभागीय पोलिस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांनी धडक कारवाई करून सुमारे ३४ लाख६७ हजार रुपये किमतीचा दारूसाठा जप्त करून एकाला ताब्यात घेण्यात आले आहे.
पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार १५ जानेवारी रोजी सकाळी ६ वाजता कर्जतचे पोलिस उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव यांना गुप्त माहिती मिळाली की, कर्जत श्रीगोंदे जाणारे रस्त्यावर एक आयशर टेम्पो विदेशी दारूची वाहतूक करणार आहे. अशी माहिती मिळाल्याने पोलीस उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव यांनी कार्यालयीन पोलीस पथक तयार करून कारवाई करीता पथक रवाना केले पथक कर्जत श्रीगोंदा रस्त्यावर गस्त करीत असताना राक्षसवाडी गावच्या शिवारात एक केसरी रंगाचा आयशर टेम्पो (एम एच१२क्यू डब्लू९६०८) असा मिळून आल्याने त्याच्याकडे पोलीस पथकाने अधिक चौकशी केली असता त्याने त्याचे नाव गीताराम आनंदा लंके रा. निघोज ता. पारनेर) असे सांगितले सदर माला बाबत तुझ्याकडे परवाना आहे का? अशी चौकशी पोलिस पथकाने केली असता टेम्पो स्वतःच्या मालकीचा असून त्यावरील नंबर चुकीचा आहे असे त्याने सांगितले पोलीस पथकाने सदर गाडीची झडती घेतली असता गाडीमध्ये मागील बाजूस कोंबड्या खाली टाकण्याचे खत त्याचे गोण्या व मागील बाजूस विदेशी दारू चे खोके आढळून आल्याने पोलीस पथकाने हा माल कोणाचा आहे विचारले असता त्याने हे दारूचे बॉक्स प्रकाश शेळके (पूर्ण नाव माहीत नाही)रा. निघोज ता. पारनेर यांच्या घरी घेऊन चाललो असल्याचे सांगितले आहे.
