श्री गाडगे महाराज मिशन मुंबईचे अध्यक्ष तथा अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी मिशनच्या बैठकीमध्ये मुंबईला शब्द दिला होता की,”बालगृह बिल्डिंगचा जीर्णोद्धार करून देणार”, शेवटी त्यांनी त्यांचा शब्द पाळला आणि कामाला सुरुवात करा, असे सांगितले, तेव्हा अमरावती जिल्हा काँग्रेस अध्यक्ष बबलू देशमुख, आमदार बळवंत वानखडे यांच्या उपस्थितीत पुन्हा जोरदार कामाची आठवण करून दिली व त्यामुळे एक तारखेपासून कामाला सुरुवात झाली.
आज आमदार बळवंत वानखडे यांनी बालगृहाच्या बिल्डींगला भेट देऊन आतून-बाहेरून काम सुरू असून, त्याची पाहणी केली, तसा अहवाल पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांना देणार असल्याचे आमदार बळवंत वानखडे यांनी बालगृहाचे संचालक गजानन देशमुख यांना सांगितले. आता लवकरच गाडगेबाबांनी ६५ वर्षे अगोदर बांधलेली बिल्डिंगचा जीर्णोद्धार होणार असून, आतून-बाहेरून छपाई व खाली स्टाईलचे संपूर्णपणे काम लवकरच पूर्ण होणार असल्याचे आमदार बळवंत वानखडे यांनी मुलांना सांगितले त्यावेळेस शिक्षक समिती तालुकाध्यक्ष तुळशीदास धांडे, बालगृहाचे अधीक्षक रितेश देशमुख, अंकुश डोंगरदिवे, इंजिनीयर जे बी कुंभलकर आदी उपस्थित होते.