प्रतिनिधी फुलचंद भगत
वाशिम:-मा.पोलीस अधिक्षक श्री.बच्चन सिंह यांनी वाशिम जिल्हयाचा पदभार स्विकारल्यापासुन गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा बसावा या करीता जिल्हयात वेळोवेळी नाकाबंदी/कोम्बींगचे आयोजन करुन अवैद्य धंदयावर कारवाई,मालमत्तेच्या गुन्हयातील आरोपींवर प्रतिबंधात्मक कारवाईचा बडगा चालु ठेवला आहे.
मकरसंक्रांती सणा निमित्त ठिकठिकाणी पंतग उडविण्याची प्रथा आहे, त्याकरीता वापरण्यात येणारा
नायलॉन मांजामुळे पक्षी तसेच बाईक स्वार यांना हानी पोचल्याच बऱ्याच घटना वेगवेगळया जिल्हयात घडल्याने
अशाप्रकारच्या अपघात होवु नये याकरीता मा.मुंबई उच्च न्यायालय, खंडपीठ नागपूर यांनी नायलॉन मांजा बंदीचे काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी प्रत्येक शहरात विशेष पथक स्थापन करण्याचा आदेश दिल्याने मा. पोलीस अधिक्षक वाशिम यांचे आदेशान्वये पोनि स्थागुशा जाधव यांनी स्थानिक गुन्हे शाखेची तिन पथके तयार करुन नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या इसमाविरुध्द कारवाईचे आदेश दिले.दिनांक १२.०१.२०२२ रोजी स्थानिक गुन्हे शाखा वाशिम येथे कार्यालयात हजर असतांना गुप्त बातमीदारांकडुन फोनद्वारे खात्रीलायक बातमी मिळाली की, बागवानपुरा वाशिम येथे १) मोहमंद अब्दुल्लाह मोहमंद हाफीज वय २१ वर्ष रा. बागवानपुरा वाशिम, २) मोहमंद अब्दुल्लाह मोहमंद हाफीज वय २१ वर्ष रा.बागवानपुरा वाशिम ३) गोपाल अशोक अढाळ वय २७ वर्षे रा जुनी नगर परिषद वाशिम यांच्या दुकानाची झडती घेतील असता एकुण १७ बंडल, २ मांजा गुंडाळण्याचे मशीन ३०००/- आणि मांजा ४२००/- असा मुददेमाल मिळुन आल्याने गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
