तुळजापूर हे शैक्षणिक,धार्मिक क्षेत्रात सर्वञ नावा रुपाला अलेले गाव आहे. त्यात आणखी भर पडली ती म्हणजे अणदूरची कन्या प्रतिभा अविनाश दाणी-घुगरे यांनी नुकतंच पिंपरी चिंचवड पुणे येथे झालेल्या “मिसेस सौदर्य महाराष्ट्र” या स्पर्धेत सहभागी होऊन “मिसेस महाराष्ट्र”हा पुरस्कार पटकाविला आहे.
प्रतिभा आविनाश दाणी- घुगरे या मुळच्या तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथील बसवराज घुगरे यांची कन्या असून त्यांचा विवाह हा अहमदनगर जिल्ह्यातील शेंडी या गावातील आविनाश दाणी यांच्याशी झाला. त्या सन २०१६ पासून महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत असून सध्या त्या पुणे येथील येरवडा कारागृहात पोलीस शिपाई या पदावर सेवेत रुजू आहेत. नोकरी घरप्रपंच सांभाळत सौदर्य स्पर्धेची तयारी करून दि.७ जानेवारी २०२२ रोजी पिंपरी चिंचवड पुणे येथे माधुरी सिक्स सिजनच्या वतीने आयोजित सौदर्य स्पर्धेत सहभागी होऊन या स्पर्धेत त्यांनी “मिसेस महाराष्ट्र”हा पुरस्कार पटकाविला असून नुकतेच त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
त्यांच्या यशामध्ये पती व सासरच्या मंडळींचा मोठा सहभाग असून भविष्यात मिस इंडिया हा पुरस्कार मिळवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी भ्रमणध्वनी वरून सांगितले. त्यांच्या या यशाबद्दल सासरी व माहेरी त्यांचे सर्वत्र आभिनंदन होत आहे.

