विशेष पोलिस महानिरीक्षक,पोलिस आयुक्तांंवर कडक कार्यवाही करा ; राज्यपाल,मुख्यमंत्री,गृहमंत्री व माहिती व जनसंपर्क मंत्री यांना पाठविले निवेदन

विशेष पोलिस महानिरीक्षक,पोलिस आयुक्तांंवर कडक कार्यवाही करा ,अ.भा.ग्रा.पत्रकार संघ,चांदूर रेल्वेची मागणी;राज्यपाल,मुख्यमंत्री,गृहमंत्री व माहिती व जनसंपर्क मंत्री यांना पाठविले निवेदन

प्रतिनिधी /चांदूर रेल्वे:धीरज पवार


गुटखा माफियांविरूद्ध दै.जनमाध्यम ने चालविलेल्या बातम्याच्या मालिके विरोधात अमरावती चे विशेष पोलीस महानिरीक्षक व अमरावती पोलीस आयुक्त यांनी सहसंपादकांना खोट्या गुन्ह्यात अडकविण्याच्या धमकी देऊन वृत्तपत्रांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आनली.या घटनेचा तिव्र निषेध करीत या प्रकरणातील दोषी अधिकाऱ्यांवर कडक कायदेशीर कार्यवाही करा अशी मागणी अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ,चांदूर रेल्वे शाखेने राज्यपाल,मुख्यमंत्री,गृहमंत्री व माहिती व जनसंपर्क मंत्री यांना चांदूर रेल्वे उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.


अमरावती शहरासह विभागात गुटखा माफियांविरूद्ध च्या बातम्या दै.जनमाध्यम च्या अकोला प्रतिनिधीकडून चालविण्यात आल्या.गुटखा माफियांविरूद्ध जनमाध्यम ने दिलेल्या वृत्तामुळे अमरावतीचे विशेष पोलीस महानिरीक्षकांनी दै.जनमाध्यम चे सहसंपादकांना खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवुन ६ महिने तुरुंगात
सडविण्याची धमकी दिली.

ते वृत्त दै.जनमाध्यमने प्रसारित केले,सोबतच जनमाध्यमचे वृत्त संचालकाला अमरावतीच्या पोलीस आयुक्तांंनी व्हाट्सअप मेसेज पाठवून पोलिसांची प्रतिमा डागाळत असल्याबद्दल एफ.आय.आर.दाखल करण्याची धमकी दिली.अमरावतीच्या इतिहासात वृत्तपत्र संपादकांना वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून अशा धमक्या देण्याचा प्रकार यापुर्वी घडल्याचे ऐकीवात नाही.महानिरीक्षक व पोलीस आयुक्तांच्या धमक्यांना न घाबरता जनमाध्यमने वृत्तमालिका चालविलेली आहे,.

तीच खऱ्या अर्थाने निर्भीड पत्रकारिता आहे.पत्रकारिता क्षेत्रामध्ये दिग्गज असणाऱ्या ज्येष्ठ व श्रेष्ठ अशा ‘पत्रकारितेला खऱ्या अर्थाने ‘परमोधर्म मानणाऱ्या पत्रकारांना पोलिसांकडून खोट्या गुन्ह्यांमध्ये अडविण्याच्या धमक्या देणे हे अमरावती पोलिसांसाठी निंदणीय बाब आहे,या धमक्या देऊन वृत्तपत्रांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणाऱ्या अधिकाऱ्यांचा अ.भा.ग्रामीण पत्रकार संघ जाहीर निषेध करतो आणि या प्रकरणाची चौकशी करून दोषी पोलिस अधिकाऱ्यांवर कडक कायदेशीर कार्यवाही करा.

अन्यथा अ.भा.ग्रामीण पत्रकार संघ संपूर्ण महाराष्ट्रभर तिव्र आंदोलन छेडेल;त्याला सर्वस्वी शासन व प्रशासन जबाबदार राहील असा इशारा निवेदनातून अ.भा.ग्रा.पत्रकार संघ,चांदूर रेल्वे शाखेने दिला.निवेदन देतांना पत्रकार युसूफ खान,प्रा.रवींद्र मेंढे,बाळासाहेब सोरगीवकर,उत्तमराव गावंडे,अमोल गवळी,राजेश सराफी,धीरज नेवारे,मंंगेश बोबडे,इरफान पठाण,विनय गोटफोडे,मनिष खुने,शहजाद खान उपस्थित होते.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!