वृत्तपत्रांचे पाठीशी समाजाने उभे राहण्याची गरज ; विष्णू कु-हाडे ; आळंदीत युवक दिन साजरा

प्रतिनिधी सुनिल बटवाल

    
चिंबळी  दि १३ (प्रतिनिधी)  : समाज विकासात वृत्तपत्र आणि पत्रकार यांचे मोठे योगदान आहे. यासाठी सेवाभावी वृत्तीने काम करणारे पत्रकार यांचेसह वृत्तपत्र यांचे पाठीशी समाजाने खंबीरपणे उभे राहण्याची गरज आहे. वृत्तपत्राना राज्यात, देशात सरकारने राजाश्रय द्यावा असे मत यशवंत संघर्ष सेनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष विष्णु कुर्‍हाडे यांनी व्यक्त केली.

महाराष्ट्र राज्य यशवंत संघर्ष सेना व एल्गार सेना महा. राज्य यांचे वतीने आयोजित प्रेरणास्थान राजमाता जिजाऊ आणि युगपुरुष स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्त युवक दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. यात जयंती निमित्त स्मृतीस अभिवादन करीत युवक दिना निमित्त स्थानिक पत्रकार बांधवांचा सन्मान सोहळा उत्साहात झाला. 

आळंदी परिसरातील पत्रकार बांधवांच्या कामाची दखल घेत विविध माध्यमांचे प्रतिनिधी पत्रकार बांधव यांचा सन्मान उपस्थित मान्यवरांचे हस्ते करण्यात आला. यात युवक दिना निमित्त जेष्ठ पत्रकार अर्जुन मेदनकर, महादेव पाखरे, भानुदास  पर्‍हाड, दादासाहेब कारंडे, अनिल जोगदंड, सुनील बटवाल, दिनेश कुर्‍हाडे, गणेश वारे, विठ्ठल शिंदे या पत्रकार बांधवांचा सत्कार करण्यात आला. 
  यावेळी व्यासपीठावर  उद्योजक उदय काळे, करण कोल्हें, यशवंत संघर्ष सेना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष विष्णू कु-हाडे, उपाध्यक्ष भागवत काटकर,पुणे जिल्हा संपर्क प्रमुख बाळासाहेब कवळासे,सातारा जिल्हा संपर्क प्रमुख गणेश गलांडे, सिद्धेश्वर सलगर, नवनाथ घायल, आळंदी जनहित फाउंडेशनचे कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर, अध्यक्ष राजेंद्र घुंडरे पाटील,ओमकार महाराज वैद्य, कल्याण महाराज कल्याणकर,  सिद्धू सलगर, बाबासाहेब जोरवर, शांताराम बोबडे, बाप्पू बगडे, इत्यादी सर्व उपस्थित होते.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!