Post Views: 772
उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देऊन केली कारवाईची मागणी
दर्यापूर – महेश बुंदे
अमरावती येथील स्थानिक दैनिक जनमाध्यम या वर्तमानपत्रात गुटखा विषयीची बातमी प्रकाशित करण्यात आलेली होती. त्या बातमी मध्ये काही आक्षेप पोलीस अधिकाऱ्यांवर घेण्यात आले ते आक्षेप चुकीचे असतील तर त्या संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांनी संबंधित वर्तमानपत्राकडे खुलासा करणे अभिप्रेत होते मात्र असे काहीही न करता अमरावती परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक चंद्रकिशोर मीना यांनी संबंधित बातमीदाराशी थेट संपर्क साधून त्याला हजर होण्यास बजावले व गुन्हा नोंदवून सहा महिने तुरुंगात सडविण्याची तर पोलीस पोलीस आयुक्त डॉ.आरती सिंग यांनी या संदर्भात पत्रकार विरुद्ध गुन्हा नोंदविण्याची भाषा वापरली. हा प्रकार पत्रकारांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला असून याचा दर्यापूर पॉवर ऑफ मीडिया तर्फे जाहीर निषेध करण्यात येत आहे.
या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषी विरुद्ध कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी निवेदनातून उपविभागीय अधिकारी यांना पॉवर ऑफ मीडिया दर्यापूर तर्फे करण्यात आली. यावेळी उपस्थित पॉवर ऑफ मीडिया उपजिल्हाध्यक्ष गजानन देशमुख, तालुकाध्यक्ष शशांक देशपांडे, माजी तालुका अध्यक्ष अमोल कंटाळे, शहर अध्यक्ष सौरभ रहाटे, जिल्हा कार्यकारणी सदस्य निलेश पारडे, पत्रकार गौरव टोळे, संदीप अरबट आदी उपस्थित होते.