Post Views: 763
त्याच्यावर फुटली झाडेझुडपे, प्रशासनाचा बेजबाबदार पणा उघड
दर्यापूर – महेश बुंदे
दर्यापूर नगरपरिषदची इमारत नवी झाली व त्यामध्ये जवळजवळ एक विभाग सोडून सर्वच विभाग त्या इमारतीमध्ये गेले आहे. आता राहिल्या जुन्या आठवणी, नगरपरिषद जुन्या इमारतच्या मागे साखरे यांच्या प्लॉटमध्ये नगरपरिषदचा ट्रॅक्टर अनेक दिवसांपासून धूळ खात उभा होता. तो ट्रॅक्टर अक्षरशा जमिनीमध्ये गाडल्या जात आहे व त्यावर झाडे झुडपे फुटल्याने हे आता दिसेनासे झाले आहे.
आता नवीन मुख्याधिकारी नगरपरिषदला मिळाले असून सर्व जुने भंगार आठ दिवसात काढून टाकणार, असे मत ते एसडीओ कार्यालयात मिटिंग करता आले असता त्यांनी बाहेर पावर ऑफ मीडियाचे पदाधिकारी यांच्यासोबत बोलताना व्यक्त केले. आता ट्रॅक्टरच मुंडक बाहेर निघणार काय ? हा मोठा प्रश्न आहे. कारण ही बाब मुख्याधिकारी वंजारी यांच्या लक्षात सुद्धा आणून दिली होती. मात्र त्यांनी याकडे दुर्लक्ष केले व ते अधिकाधिक आत गेले आता तरी त्याला कायमची मूठमाती देण्यात येणार की बाहेर काढून त्याची विल्हेवाट लावणार, हे पहावे लागणार.