जोगलदरी येथे सेंद्रीय शेती कार्यशाळा संपन्न

प्रतिनिधी फुलचंद भगत


वाशिम:-राजमाता माॅसाहेब जिजाऊ यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून समृद्ध गाव स्पर्धेमधील जोगलदरी येथे दीन दयाल सेवा प्रतिष्ठान यवतमाळ व कामधेनू गोरक्षण व अनु संशोधन केंद्र यांच्या वतीने सेंद्रिय शेती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.मान्यवरांच्या ऊपस्थीतीत ही कार्यशाळा मोठ्या ऊत्साहात पार पडली.

रासायनिक खताचा होत असलेला बेसुमार वापर यातून खालावलेला मातीचा दर्जा यावर सेंद्रिय शेती शिवाय पर्याय नाही त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी रासायनिक खतांचा बेसुमार वापर थांबवून सेंद्रिय शेतीकडे जाणे ही काळाची गरज आहे तसेच या सेंद्रिय शेती विषयीचे फायदे शेणाचा उपयोग त्यापासून गांडूळ खत तयार करणे जीवामृत गो अर्क वर्मी वाश तसेच पूर्वीची नैसर्गिक पद्धतीने केली जाणारी शेती व आजची शेती याविषयीची माहिती या कार्यशाळांमध्ये देण्यात आली.

या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून दीनदयाळ सेवा प्रतिष्ठान यवतमाळचे अनिल जी गावंडे (शेतकरी विकास प्रकल्प यवतमाळ), विभागीय समन्वयक सुभाष नानावटे, गोरक्षण महासंघाचे जिल्हा अध्यक्ष देवीदास पाटील, गजानन परसोडकर वाशिम, वैभव ठाकरे, गावचे चे सरपंच शेषराव पवार,सेंद्रिय शेती अभ्यासक राजाभाऊ इंगळे आदी उपस्थित होते.या कार्यक्रमांमध्ये मान्यवरांनी सेंद्रिय शेतीबद्दल शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले त्याचबरोबर सेंद्रिय शेती व शेतकऱ्यांना शेतामध्ये जाऊन मार्गदर्शन करून गांडूळ बेड लावून सेंद्रिय शेती बद्दल जनजागृती करणारे राजू इंगळे यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन कामधेनु गोरक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा गोरक्षण महासंघाचे जिल्हा सचिव संतोष अवताडे यांनी केले होते तसेच या कार्यक्रमाला जिल्ह्यातून तसेच तालुक्यातील सेंद्रिय शेती करणारे शेतकरी उपस्थित होते. आलेल्या सर्व मान्यवरांचे व शेतकऱ्यांचे जोगलदरी येथील प्रगतशील शेतकरी श्याम अवताडे यांनी आभार मानले.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!