प्रतिनिधी कुणाल शिंदे
सातारा–वाई तालुक्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री मांढरदेवी काळुबाई देवीची यात्रा महोत्सव यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आली आहे.

मांढरदेवी काळुबाईच्या यात्रेसाठी महाराष्ट्रातील व कर्नाटकातील असंख्य भाविक श्री काळेश्वरी देवीच्या दर्शनासाठी येतात. यावर्षी देखील मांढरदेवी यात्रा प्रतिवर्षीप्रमाणे १६, १७,१८ जानेवारी या तारखेला होणार असून तीन दिवसीय नियोजित आहे.

चालू वर्षी १७ तारखेला यात्रेचा मुख्य दिवस आहे .मांढरदेवीच्या गडावर या दिवशी पौष पौर्णिमेला मोठी यात्रा भरते. मात्र यात्रेच्या 15 दिवस अगोदर व यात्रेच्या 15 दिवस नंतर लाखो भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी गर्दी करतात.

त्यामुळे गर्दीमुळे कोरोनाच्या संसर्ग प्रसार होऊ नये म्हणुन भावीक भक्तांनी दर्शनासाठी न येण्याचे आव्हान मांढरदेवी देवस्थान ट्रस्ट यांच्याकडून करण्यात आले आहे.
तसेच सातारा जिल्ह्याचे माननीय जिल्हाधिकारी राजेंद्र जाधव यांच्या आदेशानुसार दिनांक १० जानेवारी 2022 ते दिनांक १ फेब्रुवारी 2021 या कालावधीमध्ये श्री मांढरदेवी काळूबाई चे मंदिर हे भाविकांना पूर्णता बंद ठेवण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे.

त्याचप्रमाणे या कालावधीमध्ये कोणीही श्री क्षेत्र मांढरदेव याठिकाणी कोणी येऊ नये. मांढरदेवी मंदिरातील देवीचे धार्मिक कार्यक्रम हे फक्त पुजारी व ट्रस्ट सदस्य हेच पाडतील, तसेच येत्या काळात भाविकांना कुठेही तंबू उभे करता येणार नाही. पशुपक्ष्यांचे बळी दिले जाणार नाही. व परिसरातील 10 गावांमध्ये कुठे सार्वजनिक ठिकाणी कलम 144 नुसार एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे.

त्याचप्रमाणे श्री मांढरदेवी देवस्थान ट्रस्टचे सचिव श्री.सचिन खामकर यांनी देखील भावीकांना सूचना करण्यात आले आहे व दर्शनासाठी कोणीही भाविक भक्तांनी मांढरदेव गडावर न येण्याचे भाविकांना आवाहन केले आहे.
