चाकण प्रतिनिधी :- पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने खेड तालुक्यातील बहुळ गावात मोठी कारवाई केली आहे. एका टोळीने ओरिसा राज्यातून आणलेला 98 किलो गांजा पोलिसांनी पकडला आहे.याप्रकरणी एका महिलेसह तिघांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई सोमवारी (दि. 10) दुपारी करण्यात आली.
चेतन हरिराजी पुरोहित (वय 29, रा. शिरगाव, ता. मावळ, पुणे. मूळ रा. राजस्थान), कांतीलाल मांगीलाल घांची (वय 23, रा. पुनावळे, पुणे. मूळ रा. राजस्थान), मोनिका हकीम सिंह (वय 22, रा. नवी मुंबई. मूळ रा. उत्तर प्रदेश) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
अटक केलेल्या आरोपींसह कुमकुम (रा. ओडिसा), गणेश उर्फ दीपक पवार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सहाय्यक पोलीस फौजदार जिलानी मुसा मोमीन यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
