Post Views: 692
ई गणेशा फाउंडेशनचा अभिनव उपक्रम
दर्यापूर – महेश बुंदे
अनाथ बालकांना मायेची सावली देणारी “माय” अशी ओळख असणाऱ्या सिंधूताई सपकाळ यांचे दिनांक ४ जानेवारी २०२२ रोजी दुःखद निधन झाल्याने सगळीकडे हळहळ व्यक्त करण्यात आली. हजारो अनाथ बालकांच्या डोक्यावरील छत्र हरविल्याने बालके पोरकी झाली. माईंचे कार्य येणाऱ्या पिढ्यांसाठी प्रेरणादायी असून त्यांचे समाजासाठीचे योगदान उल्लेखनीय आहे. दिनांक ११ जानेवारी २०२२ रोजी माईंची प्रतिमा ग्रामपंचायत येवदा येथे लावून त्यांना ई गणेशा फाउंडेशन येवदाच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
येवदा येथील सर्व शासकीय कार्यालये, अंगणवाड्या, सर्व जिल्हा परिषद शाळांमध्ये माईंच्या कार्याचा गुणगौरव होण्याच्या दृष्टीने प्रतिमा भेट देण्याचा मानस ई गणेशा फाउंडेशन तर्फे व्यक्त करण्यात आला. या प्रसंगी उपसरपंच मुजम्मील जमादार, ई गणेशा फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. अरुण चोरे, नकुल सोनटक्के, कुंदन मोहोड, ज्ञानपाल राऊत, पंकज कैकाडी, स्वराज तिवाने इत्यादी व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.