राञीचे लसिकरण सञ बंद न केल्यास आंदोलनाचा इशारा
जिल्हाधिकारी यांचेसह सबंधित विभागाला लेखी निवेदन सादर
प्रतिनिधी फुलचंद भगत
वाशिम:-प्रशासकीय वरिष्ठ स्तरावरून रविवार,सुट्टीचे दिवस तसेच राञीचे लसिकरण सञ आयोजीत केले आहे.याला विरोध करत मंगरूळपीर तालुक्यातील आरोग्य अधिकारी व आरोग्य कर्मचारी यांनी जिल्हाधिकारी यांचेसह विविध स्तरावर लेखी निवेदन सादर केले आहे.मागणी मान्य न झाल्यास आंदोलनाचाही इशारा या आरोग्य विभागातील कर्मचार्यांनी दिला आहे.

मागील दिड ते दोन वर्षापासुन कोरोनाने सर्वञ थैमान घातले आहे.या महामारीत नियमित राष्टीय आरोग्य कार्यक्रमासोबतच कोविड महामारीचे कामे,लसिकरण,तपासण्या आरोग्य विभागामार्फत आपापल्या कार्यक्षेञात अविरतपणे करीत आहेत.कोविड १९ चे लसिकरण सुरु झाल्यापासुन प्रशासकिय आदेशावरुन रविवार तसेच सुटीच्या दिवशी तर लोकांच्या वेळेनुसारही ऊशीरापर्यत सबंधित गावात थांबुन तसेच गरज पडल्यास लोकांच्या घरी जावून लसिकरणाचे ऊदिष्ट पुर्ण करण्याचा प्रयत्न सुरु आहे.

यामुळे आरोग्य विभागातील अधिकारी कर्मचार्यांच्या मानसिक व शारिरिक आरोग्यावर विपरित परिनाम होत आहे.तरीसूध्दा आपण रविवार व सुट्टीच्या दिवशी आणी राञीच्या वेळी लसिकरण सञ आयोजित करीत आहात.संध्याकाळी ऊशीरापर्यत आणी राञीच्या वेळी लसिकरण सञ नियोजित केल्यास विषेशतः महिला कर्मचार्यांवर अनुचित प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत असल्याने या बाबीचा गांभिर्याने विचार करुन आमची मागणी मान्य करावी अन्यथा आंदोलन करण्यात येइल असा इशारा आरोग्य कर्मचार्यांनी प्रशासकीय यंञणेला लेखी निवेदनाव्दारे दिला आहे.
