शहरातील राजकारण तापले, आरोप प्रत्यारोप,
वराहांची मात्र पळापळ
चांदूर रेल्वे – धीरज पवार/सुभाष कोटेचा
चांदूर रेल्वे शहरात मोकाट वराहांचा नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. नगर परिषदला अनेकदा निवेदन दिले, तोंडी सूचना दिल्या तरी काही कारवाई झाली नाही. त्यामुळे अखेर सोमवारी सकाळपासून माजी नगरसेवक बच्चू वानरे, साहस बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष चेतन भोले यांच्या नेतृत्वात शहरवासीयांनी आक्रमक पवित्रा घेत रस्त्यावर उतरून मोकाट वराह पकडण्यासाठी ट्रॅक्टर घेऊन निघाले होते. यामध्ये बरेच वराह पकडण्यात आले असुन या मोहीमेच्या वेळी सकाळी ११ वाजतापर्यंत शहरातील अनेक प्रतिष्ठाने बंद ठेवण्यात आली होती. स्थानिक नगर परिषद मधील सत्ताधारी आणि अपक्ष नगरसेवक यांच्यामधील आरोप – प्रत्यारोपणे शहरातील राजकारण तापले असल्याचे पाहायला मिळाले.

चांदूर रेल्वे शहरातील वराहांच्या हैदोसावरून सामाजिक संघटनेने आवाज उचलल्यानंतर, त्याला मिळणारा प्रतिसाद पाहून व नगर परिषद मधील आगामी निवडणुका पाहून अनेकांनी त्यात भाग घेतल्या असल्याची ही चर्चा शहरात ऐकायला मिळाली. नगर परिषद वराहांचा बंदोबस्त करत नसेल तर आम्ही मारतो अशी भूमिका घेत सोमवारी सकाळ पासूनच संघटनेच्या सदस्यांनी, नागरिकांनी वराह पकडण्याचे काम सुरू केल्याचे दिसून आले. यात साहस संघटना, युवक गणेश मंडळ, विश्व हिंदू परिषद इत्यादी संघटनांनी सहभाग घेऊन वराह पकडण्याचे प्रायोगिक आंदोलन केले. अनेक वराहांना पकडून शहरभर त्यांची धिंड ही काढली. यावरून शहरभर वराहांची होणारी पळापळ दिसून आली. याशिवाय नगर परिषदेतर्फे सुध्दा नियोजित वराहाच्या बंदोबस्ताची मोहीम सोमवारी राबविण्यात आली. यामध्ये अनेक वराहांचा बंदोबस्त लावण्यात आला असुन आता नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. नगर परिषेदेतर्फे ही मोहीम आज मंगळवारी सुध्दा राबविण्यात येणार आहे. तर कोविड प्रतिबंधक नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी सोमवारी झालेल्या आंदोलनातील आंदोलकांवर प्रतिबंधनात्मक कार्यवाही नगर परिषदेतर्फे प्रस्तावित केल्या जाईल अशी माहिती न. प. आरोग्य व स्वच्छता निरिक्षक राहुल इमले यांनी दिली.
१) न. प. आवारात सोडणार वराह – बच्चू वानरे
शहरात गेल्या दिवाळी पासून वराहांचा हैदोस वाढला आहे. सर्व नागरिकांना, व्यापाऱ्यांना याचा त्रास होत आहे. अनेकांनी निवेदने देऊन न.प. प्रशासन झोपेचे सोंगमोकाट वराहांच्या प्रश्नावर जनता आक्रमक घेत आहे. परंतु आता या वराहांच्या बंदोबस्तासाठी जनता रस्त्यावर उतरली आहे. आम्ही सोमवारी स्वतःच वराह पकडूनन.प. आवारात सोडत असल्याची प्रतिक्रिया नगरसेवक बच्चू वानरे यांनी दिली.
२)आंदोलन म्हणजे केवळ नौटंकी – गोटू गायकवाड
दिवाळी पासून वहारांचा त्रास होता असे तथाकथित जनसेवक म्हणतात तर मग आज त्यांना जाग का आला? त्यांचे आंदोलन म्हणजे केवळ नौटंकी. शहरातील सर्व समस्या सुटल्या आणि वराह हाच प्रश्न राहिला असे वातावरण निर्माण केल्या जात आहे. सभागृहात विरोधी पक्ष सोडून आमच्या सोबत बसणारे नगरसेवक कार्यकाळ संपताच विरोधी पक्षाचा आव आणत आहे. वराहाची समस्या आहेतच, पण २०१८ मध्ये जनसेवक म्हणविणारे बच्चू वानरे यांनीच वराह पकडण्याच्या मोहिमेला विरोध केला होता. आणि त्यासाठीच आता आंदोलन करीत आहे, ही नौटंकी नागरिकांना कळतेच असे मत माजी काँग्रेस गटनेते गोटू उर्फ वैभव गायकवाड यांनी व्यक्त केले.
३)पुन्हा नवीन निविदा प्रकाशित करू – सीओ डॉ. वासनकर