चाकण वार्ता :- खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत तिघांनी मिळून एका व्यक्तीकडून दोन हजार रुपये खंडणी उकळली. या प्रकरणी व्यक्तीच्या तक्रारीवरून तिघांना अटक करण्यात आली आहे.ही घटना शनिवारी (दि. 8) दुपारी अडीच वाजताच्या सुमारास चाकण येथील जनावरांच्या बाजार रोडला घडली.
निलेश भरत कुचेकर, राहुल शंकर पारवे, सुदर्शन उर्फ गुड्या सुनील आरकडे (सर्व रा. महात्मा फुले नगर, चाकण) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी अतुल दिलीप राऊत (वय 36, रा. नेरळ, ता. कर्जत) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
