(टक्केवारीसाठी मजबूत स्थिती मधील रोड फोडून पुन्हा करण्यात येत आहे तयार)
दर्यापूर – महेश बुंदे
दर्यापूर शहर मधील
सांगळूदकर नगर मधील रोडची दयनीय अवस्था एका पावसाच्या ठोका मध्ये संपूर्ण रस्त्यावरील पाणी लोकांच्या घरांमध्ये शिरत आहे. सर्वात जास्त नगरपरिषदेला कर ह्याच नगर मधून जात असल्याने विकास शून्य कामे दिसत आहेत. आजी-माजी लोकप्रतिनिधी यांची बघ्याचीच भूमिका असून कुठल्याच प्रकारचे विकासकामे या नगरामध्ये होत नसल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

प्राध्यापक शिक्षक सदन कास्तकार उच्च पदावर कार्यरत असलेले याच नगरमध्ये वास्तव्यास आहेत. तक्रार केली असता लोकप्रतिनिधी आपल्या नोकरीवर गंडांतर आणण्याच्या भीतीने नागरिक तक्रारी देण्यास घाबरत आहेत. हे एक शाश्वत सत्य डॉक्टर दिनेश म्हाला यांच्या घरापासून तर विनायक गावंडे यांच्या घरापर्यंत रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते असा प्रश्न उपस्थित झाला आहे. आजी-माजी नगरसेवकांनी रस्त्याचा पाठपुरावा केला असता तर ही परिस्थिती उद्भवली नसती असे नागरिकांनी मत व्यक्त केले आहे. दर्यापूर मधील तीनही भागात संपूर्ण सिमेंट काँक्रिटच्या रस्त्याचे जाळे पसरले आहे. शहरांमध्ये नगरपालिका विभागात करोडो रुपये निधी येत असून हा जातो कुठे ?नगरपालिकेमध्ये केवळ टक्केवारी वरच काम केली जात असल्याचे स्पष्ट होत आहे. जनसामान्यांमध्ये शहराचा विकास टक्केवारी वरच अवलंबून आहे का याबाबत जनमाणसात संभ्रम निर्माण झाला आहे.
प्रतिक्रिया —
➖➖➖➖➖➖➖
मी प्रभाग क्रमांक १० मधील नागरिक आहे. गेल्या पाच वर्षापासून आम्ही या नगराचे रहिवासी आहोत मात्र अद्यापही रोडची व नालीचे कामे झालेली नाहीत. एका पावसाच्या ठोका मध्येच संपूर्ण रस्त्यामधील पाणी नागरिकांच्या घरांमध्ये शिरत आहे या पाण्याने रोगराई पसरत असून लहान बालकांना साथीच्या रोगाची लागण होत आहे. कोरोना डेंगू मलेरिया या रोगांना घरबसल्या आमंत्रण मिळत आहे
राजेश्वर पाटील भांडे, नागरिक
➖➖➖➖➖➖➖
सांगळूदकर नगर भागाची पाहणी मी केली आहे. नालीच्या बांधकामाला लवकरच सुरुवात करू त्याचबरोबर रस्त्याच्या बांधकामाचा आढावा घेतल्या नंतर बांधकामाला सुरुवात होईल
प्रशासक पराग वानखडे नगरपरिषद, दर्यापूर
➖➖➖➖➖➖➖