पोलीस व अन्नसुरक्षा प्रशासनाची गुटखा माफियावर संशयास्पद कारवाई ,केवळ एक आरोपी अटक ,मुख्य सुत्रधार मोकाट,घटनास्थळ वेगळे व कारवाई दुसरीकडेच!

रवि मारोटकर ब्युरो चीफ

अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर येथे दिनांक 8 जानेवारी 2022 रोजी गुटख्याची वाहतूक करणारी गाडी पकडण्यात आली.त्यातील माल जप्त दाखवण्यात आला मात्र, प्राप्त माहितीनुसार सदर गाडी सकाळी नऊच्या सुमारास नांदगाव खंडेश्वर बस स्थानकावर उभी होती व हा माल नांदगाव खंडेश्वर येथे संबंधित गुटका माफिया कडे सुपूर्द करण्यात येणार होता,मात्र पोलीस प्रशासनाने जरी कारवाई केली असली तरी या बाबत झालेली कारवाई ही संशयास्पद व गौडबंगाल असणारी आहे अशी चर्चा सर्वत्र पसरली आहे.

याबाबत सईद अहमद अब्दुल रफिक या एकमेव आरोपीला अटक करण्यात आली असून हा माल कोणत्या गुटका माफिया कडून आला व कोणत्या गुटका माफियाला पोहोचवण्यात येणार होता,याबाबत कारवाई करण्यात आली नाही. उल्लेखनीय म्हणजे ही नांदगाव खंडेश्वर पोलिसांनी पकडली असली तरी सदर गाडी पोलीस स्टेशनच्या आवारात कारवाई करताना हजर नव्हती, व ही कारवाई कोण्या ठिकाणी करण्यात आली व गाडीचे फोटो तथा व्हिडीओ पत्रकारांना मिळू शकले नाहीत. त्यामुळे याबाबत कुठेतरी जास्त पाणी मुरले व जनतेचे आरोग्य कोरोना काळात उध्वस्त करणाऱ्या मुख्य सूत्रधारांना वाचण्यात आले अशी जनते चर्चा आहे.

याबाबत अनेक सामाजिक संघटना व कार्यकर्ते सामान्य जनतेला न्याय मिळण्यासाठी दाद मागणार आहेत अशी प्रतिक्रिया यासंदर्भात अनेकांनी दिली.


पोलिस स्टेशन नांदगाव खंडेश्वर जिल्हा अमरावती अपराध क्रमांक: 23/2022 अन्न सुरक्षा मानके अधिनियम2006 कलम 26(2),27,23,30(2),(a),59 भा द वी कलम 328,272,273,188,269,270 नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.


फीर्यादी सीमा राम सुरकर, अन्न सुरक्षा अधिकारी,अन्न सुरक्षा प्रशासन अमरावती सूर्यवंशी, अन्न सुरक्षा अधिकारी तसेच पो. स्टाफ- पो.हवा. गणेश खंडारे, पो.हवा. विष्णुपंत तिरमारे, पो.शि. सदाशिव देवकाते, पो.शि. राम ढाकणे यांनी कारवाई केल्याचे पोलीस प्रशासनाच्या पत्रकात नमूद केले आहे.


आरोपी सईद अहमद अब्दुल रफिक कुरेशी, वय 31 वर्ष,जात – मुस्लिम, रा मदरसा जवळ गवळी पुरा अमरावती या एकमेव आरोपीला अटक करण्यात आली आहे.
घटनास्थळ यवतमाळ -अमरावती हायवे वरील नांदगाव खंडे पवार हाऊस समोर हे दर्शविण्यात आले आहे मात्र, या गाडीचा नांदगाव खंडेश्वर बस स्थानकावरील फोटो उपलब्ध आहेत.


घटना.ता/वेळ 08/01/2022 चे 11/00 वा ते 12/00 व दरम्यान घटनास्थळ – यवतमाळ अमरावती हायवे वरील नांदगाव खंडे जवळील पावर हाऊस समोर घडल्याचे दाखवण्यात आले आहे.


तपासी अधिकारी psi प्रदीप कांबळे पो स्टे नांदगाव खंडे हे आहेत. तर मिळालेला माल (1) पान बहार मसाला 190 पॉकेट कीं 28500
(2) विमल पान मसाला 200 पॉकेट कीं 39600 रु
(3) व्ही 1 सुगंधित तंबाखू 200 पॉकेट कीं -4400रु
(4) अँटी नं 1 स्वीट सुपारी 248 पॉकेट कीं 14880
(5 ) गाडी क्र mh 10,A Q 4008 ची कीं 200000 रु असा एकूण 287380 चा जप्त माल करून आरोपी आरोपी अटक आली आहे.

पोलिस सुत्रांनुसार हकीकत अशाप्रकारे आहे की, यातील नमूद घटना तारीख वेळी व ठिकाणी मिळालेल्या गुप्त खबरेवरून अन्न सुरक्षा अधिकारी व पो स्टाफ गणेश खंडारे, विष्णुपंत तिरमारे, सदाशिव देवकाते,राम ढाकणे यांनी रेड केली असता आरोपीचे ताब्यातून महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेले पान मसाला, सुगनधित तंबाखू व स्वीट सुपारी मिळून आला तसेच लोकसेवकाच्या आदेशाचे उल्लंघन करून संसर्गजन्य रोगाचा प्रसार होऊन जनसामान्यांच्या जीवितास धोका निर्माण केल्यामुळे सदरचा गुन्हा नोंद करून तपासात घेतला असे प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!