राज्यात आजपासुन नवीन नियमावली जाहीर, काय आहेत कोरोना नियम पहा

राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे राज्य सरकारकडून खबरदारी घेतली जात आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकाने राज्यात कडक निर्बंध लागू करत मिनी लॉकडाऊनची घोषणा केली आहे.


राज्यात दिवसा जमावबंदी तर रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. दिवसा अत्यावश्यक कामाशिवाय ५ पेक्षा अधिक लोक एकत्र आल्यास त्यांच्यावर कारवाई होऊ शकते. तसेच दोन लसीचे डोस घेतलेल्यांनाच सार्वजनिक वाहनातून प्रवास करता येणार आहे. २४ तास कार्यरत असणाऱ्या अस्थापनांना अत्यावश्यक सेवेत मोडण्यात आले आहे. दरम्यान लोकलबाबत राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील नागरिकांना कोरोना नियमांचे पालन करण्याचे आवाहन केलं आहे. कोरोना नियमांचे पालन करण्यात हलगर्जीपणा केल्यास कठोर कारवाई करण्याचा इशारासुद्धा मुख्यमंत्र्यांनी यंत्रणांना दिला आहे. खाजगी कार्यालयांतही ५० टक्के उपस्थितीची परवानगी दिली आहे. तसेच व्यायाम शाळा, स्पा,स्विमींग पूल बंद ठेवण्याचे निर्देश नियमावलीमध्ये देण्यात आले आहेत. राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या नियमावलीमध्ये काय बंद आणि काय चालू ते .
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारचे नेमके नियम कोणते?

  • पूर्वनियोजित असलेल्या सर्व विद्यार्थ्यांच्या परीक्षा होणार

-एमपीएससी, युपीएससीच्या परीक्षांना परवानगी असेल

  • रात्री ११ ते पहाटे ५ वाजेपर्यंत नाईट कर्फ्यू असेल, या वेळेत कोणालाही फिरता किंवा प्रवास करता येणार नाही. केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना परवानगी असेल.
  • जिल्हास्तरावर आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धांना कोरोना नियमांचे पालन करुन परवानगी असेल. तसेच विना प्रेक्षक परवानगी देण्यात आली आहे.
  • सामाजिक, धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसह राजकीय कार्यक्रमांना परवानगी असेल.
  • आंतरराष्ट्रीय प्रवास केंद्राच्या परवानगीप्रमाणे होणार आहे.
  • राज्यांतर्गत प्रवासासाठी आरटीपीसीआर चाचणी ७२ तासात केलेली असावी. तसेच त्याचा अहवाल निगेटिव्ही असणं बंधनकारक आहे.

राज्यात काय सुरु राहणार ?

  • हॉटेल, रेस्टॉरंट रात्री १० वाजेपर्यंत सुरु ठेवता येणार केवळ ५० टक्के आसन व्यवस्था ठेवण्यात येणार
  • शॉपिंग मॉलमध्ये ५० टक्के क्षमता बंधनकारक
  • चित्रपटगृह आणि नाट्यगृह ५० टक्के क्षमतेनं सुरु राहणार
  • पहिल्या लाटेत सलून बंद असल्याने नुकसान झाले होते. यामुळे आता ५० टक्के क्षमतेनं सलून सुरु ठेवण्याची परवानगी (रात्री 10 ते सकाळी 7 काळात हेअर कटिंग सलून बंद राहतील.)
    शॉपिंग मॉल, मार्केट कॉम्प्लेक्समध्ये मर्यादित प्रवेश. लसीकरण पूर्ण झालेल्या व्यक्तींनाच प्रवेश
    रेस्टॉरंट्स आणि उपहारगृह 50 टक्के क्षमतेने सुरू. लसीकरण पूर्ण झालेल्या व्यक्तींनाच प्रवेश.
    अन्नपदार्थांची होम डिलीव्हरी सुरू राहणार.
    UPSC, MPSC सारख्या स्पर्धा परीक्षा केंद्राच्या सूचनांनुसार होणार.

काय बंद राहणार ?

  • राज्यातील सगळ्या प्रकारची पर्यटन स्थळं बंद ठेवण्यात येणार
  • स्विमींग पूल, व्यायाम शाळा आणि स्पा १०० टक्के बंद राहणार
  • मैदान, संग्रहालये, बाग, प्राणी संग्रहालय, गडकिल्ले पर्यटकांसाठी बंद असतील
  • शाळा कॉलेज १५ फेब्रुवारीपर्यंत बंद
    एन्टरटेन्मेंट पार्क, प्राणी संग्रहालय, म्युझियम, किल्ले आणि तिकीट लागणाऱ्या इतर सार्वजनिक जागा बंद.
  • लग्न कार्यासाठी ५० लोकांची उपस्थिती असणे बंधनकारक
  • अंत्यसंस्कारासाठी २० लोकांना परवानगी
  • सामाजिक, धार्मिक आणि राजकीय कार्यक्रमांना ५० लोकांची उपस्थिती असेल.
    ● डोमॅस्टिक फ्लाईट्ससोबतच ट्रेन, रोड-वे ने राज्यात प्रवास करत यायचे असल्यास संपूर्ण लसीकरण किंवा आरटीपीसीआरचा निगेटीव्ह रिपोर्ट 75 तासांपूर्वीचा बंधनकारक आहे. ड्रायव्हर, क्लीनर आणि स्टाफला देखील नियम लागू आहेत. धार्मिक स्थळांबाबत मात्र नियमावलीत कुठलाही उल्लेख करण्यात आलेला नाही.

लॉकडाऊनची गरज नाही – राजेश टोपे

सध्या महाराष्ट्रात लॉकडाऊन लावण्याची गरज नाही, मात्र गर्दी रोखण्यासाठी काही निर्बंध लावावे लागतील, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी याआधी स्पष्ट केलं होतं.

राजेश टोपे याबद्दल बोलताना म्हणाले होते, “नव्या रूग्णांसाठी क्वारंटाईन पिरीयड सात दिवसाचा करणार. 90% लोकांमध्ये लक्षणं नाहीत. पण वाढती रूग्ण संख्या हा चिंतेचा विषय आहे.

अँटीजेन टेस्ट केली तर RT-PCR टेस्ट करण्याची गरज नाही. सध्या लॉकडाऊनची गरज नाही, पण गर्दी रोखण्यासाठी काही निर्बंध लावावे लागतील.”

होम आयसोलेशनसाठीच्या नवीन गाईडलाईन्स

केंद्र सरकारने आयसोलेशनसाठीच्या नवीन गाईडलाईन्स प्रसिद्ध केल्या आहेत.

टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर सात दिवसांनी आणि तीन दिवस ताप नसेल तर होम आयसोलेशननध्ये असलेला रुग्ण डिस्चार्ज धरला जाईल.

होम आयसोलेशन संपल्यानंतर पुन्हा टेस्ट करण्याची गरज नाही.

रुग्णांच्या कुटुंबीयांना लक्षणं नसतील तर टेस्ट करणं गरजेचं नाही. घरी आरोग्य तपासणी करावी.

होम आयसोलेशनमध्ये असलेल्या रुग्णांनी टृीपल लेअर मास्क सतत घालून ठेवावा.

आठ तासांनी मास्क बदलावा. मास्क 72 तास एका पेपरमध्ये बांधून ठेवावा. मग फेकून द्यावा.

रुग्णाने हवा खेळती राहील अशा रूममध्ये रहावं.

रुग्णाच्या वस्तूला कोणीही हात लावू नये.

रुग्णाने शरीरातील ऑक्सिजन चाचणी (SPO2) करावी.

रुग्णांनी घरी गरम पाण्याच्या गुळण्या कराव्यात किंवा तीन वेळा दिवसातून वाफ घ्यावी.

ताप उतरत नसेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने दिवसातून चार वेळा पॅरेसेटिमॉल 650 mg ची गोळी घ्यावी.

डॉक्टरांनी सांगितल्याशिवाय चेस्ट X रे, रक्ततपासणी आणि CT scan करू नका. स्वतःवर औषधाचे प्रयोग करु नका.

याबाबत काटेकोर तपासणी करण्याची जबाबदारी अनुज्ञप्ती प्राधिकारी, आयुक्त मनपा, जिल्हा पोलीस अधीक्षक यांची असेल, असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.


कोणत्याही परिस्थितीत कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे तसेच कोविड अनुरूप वर्तनाचे पालन केले जात आहे किंवा नाही याची खातरजमा करण्यासाठी सक्षम प्राधिकाऱ्याला संबंधीत आस्थापना यांनी तपासणीसाठी उपलब्ध करून देणे आवश्यक राहील. निर्बंधांचे उल्लंघन करणाऱ्यावर तसेच संबंधित आस्थापनांवर दंडनीय कारवाई करण्यात येईल.

मुख्यमंत्री काय म्हणाले..?

वारंवार टास्क फोर्स, केंद्रीय आरोग्य विभाग यांच्याशी चर्चा करून तसेच वैद्यकीय क्षेत्रातील सर्व संबंधितांशी विचार विनिमय करून आपण राज्यात काही निर्बंध लावण्याचे ठरविले आहे. मी स्पष्ट करतो की, आपल्याला कुठलाही लॉकडाऊन करून सगळं ठप्प करायचे नाही. केवळ कायदे आणि नियम करून अशा आव्हानांचा मुकाबला होऊ शकणार नाही, तर प्रत्येक नागरिकाने मग तो समाजातला कुणीही घटक असो प्रत्येकानं आता ही लढाई अंतिम आहे आणि हा शेवटचा घाव कोरोनावर करायचाच अशा निश्चयानं आरोग्याचे नियम पाळायचे आहेत,” असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

रोजी रोटी बंद करायची नाही, जीवन थांबू द्यायचे नाही पण.”

“आपल्याला काम बंद करायचे नाही तर गर्दी बंद करायची आहे. रोजी रोटी बंद करायची नाही, जीवन थांबू द्यायचे नाही पण काही बंधने पाळून या विषाणूपासून राज्य कायमचे मुक्त करायचे आहे,” असंही त्यांनी नमूद केलं.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले,”अजूनही लस घेतली नसल्यास लगेच घ्या. आज या विषाणूची तीव्रता आपल्याला जाणवत नसेल किंवा मृत्यू दर कमी असेल तर तो केवळ लसीकरणामुळे आणि सतत मास्क घालणे, सुरक्षित अंतर ठेवणे या सवयीमुळे. काही जिल्ह्यांत लसीकरण पुरेसं झालेलं नाही, तिथं रुग्ण संख्या अधिक वाढून रुग्णालयांमध्ये दखल होण्याचं प्रमाणही वाढू शकतं. त्यामुळे लसीकरण कमी असलेल्या जिल्ह्यांच्या बाबतीत निर्बंध अधिक कठोर करण्याचा पर्याय देखील सरकारकडे आहे”.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!