स्वराज्य वार्ता प्रतिनिधी कुणाल शिंदे
पुणे :- खेड तालुक्यातील अनेक गावांतील नागरिकांनी शासनाने चालु केलेल्या कोविड 19 प्रतिबंधात्मक लस घेऊन देखील नावनोंदणी होत नसल्याने आरोग्य विभागाचा सावळा गोंधळ पुन्हा समोर आला आहे.

खेड तालुक्याचा चाकण औद्योगिक नगरीमुळे झपाट्याने विकास होत चालला आहे. त्यामुळे अनेक नागरिक,भाडेकरू, कामगार वर्ग हा परराज्यातून या चाकण परिसरात व तालुक्यातील भागात वास्तव्यास आहे. जगात कोरोनाने पुन्हा थैमान घातले असताना कोरोनाची तिसऱ्या लाटेने महाराष्ट्राची चिंता वाढत चालली आहे. कोरोनाच्या या भयंकर महामारीला प्रतिबंधात्मक म्हणून भारत सरकारने प्रत्येक नागरिकांचे कोविड 19 लसीकरण चालूं केले.या लसीकरणाला अनेक नागरिकांनी उत्स्फूर्तपणे हजेरी लावली.अनेक नागरिकांचे २ डोस पूर्ण झाले आहे. परंतु खेड तालुक्यातील अनेक नागरिकांनी, महिलांनी, भाडेकरूंनी लसीचा पहिला डोस घेऊन देखील नावनोंदणी न झाल्याने त्या संभ्रमात आहे.त्यामुळे आरोग्य विभागाकडून होणाऱ्या लसीकरणाचा सावळा गोंधळ उडाला आहे.
