प्रतिनिधी सुनील बटवाल /
चिंबळी दि ८(वार्ताहर) श्री क्षेत्र आळंदी व तुळापूर जवळ असलेल्या मरकळ येथील भैरवनाथ महाराज व हनुमान महाराज यांच्या उत्साहा निमित्ताने यात्रा कमिटी व ग्रामस्थांच्या वतीने दोन्ही मंदिरातला भव्य विद्युत रोषणाई करुन शासनाच्या आदेशानुसार प्रतिबंधक उपाय म्हणून साद्यापद्धतीने उत्साहाचे आयोजित करण्यात आले होते.
या निमित्ताने मंदिरात पहाटे काकड आरती महापुजा अभिषेक करण्यात आला तर यावेळी मरकळ परिसरातील भाविकांनी सँनिटायझर व मास्क वापर करून संगीत भजनांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी भैरवनाथ मंदिर व मारुती मंदिरात ग्रामस्तानी नैवेद्य दाखवण्याची व श्रीफळ अर्पण करण्यासाठी करोना रोगाच्या प्रादुर्भावामुळे शासनाच्या आदेशानुसार प्रतिबंधक उपाय म्हणून तंतोतंत पालन करत दर्शनासाठी हजेरी लावत होते तर गुरूवार दि ६ रोजी दुपारी ४ते ७ प्रर्यत भव्य निकाली कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते .या स्पर्धेसाठी १००रु ते ११००० हजार रुपये व एक चांदीची गदा बक्षिस ठेवण्यात आली होती या स्पर्धेत खेड हवेली मावळ मुळशी शिरूर. आदि तालुक्यातील सुमारे २००मल्ल सहभागी झाले होते .
