दर्यापूर – महेश बुंदे
महाराष्ट्र नवनिर्माण सेना दर्यापूर तालुक्याच्या वतीने दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त साजऱ्या केल्या जाणाऱ्या पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. हा कार्यक्रम गुरुवार, ६ जानेवारी २०२२ रोजी सायंकाळी ६ वाजता शिवर येथील गजानन महाराज मंदिराच्या खुल्या परिसरात आयोजित करण्यात आला होता. यंदा सोहळ्याचे १३ वे वर्ष आहे. अशी माहिती मनसेचे माजी जिल्हाध्यक्ष राजेंद्र गायगोले यांनी दिली.
सुरुवातीला सामाजिक कार्यकर्त्या आणि अनाथांची माय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कार्यकर्त्या पद्मश्री सिंधुताईंना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. याच कार्यक्रमात पत्रकारांच्या वतीने गजानन देशमुख, शशांक देशपांडे, संजय कदम, महेश बुंदे त्याचबरोबर व्यासपीठावरील मान्यवरांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर पत्रकारिता क्षेत्रांमधील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पत्रकारांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले यामध्ये ग्रामीण भागातील गजानन देशमुख, संजय कदम, शशांक देशपांडे, सुरेशसिंह मोरे, धनंजय धांडे, अनंत बोबडे, सचिन मानकर, विलास महाजन, अमोल कंटाळे, धनंजय देशमुख, गौरव टोळे, विकी होले, महेश बुंदे, युवराज डोंगरे, सचिन बोदडे, राम रघुवंशी, सौरभ रहाटे, अभिजीत मावळे, चेतन रोकडे, वृत्तपत्रविक्रेता विनोद शिंगणे आदींना सन्मानित करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून मनसेचे माजी जिल्हाध्यक्ष राजेंद्र गायगोले, प्रमुख उपस्थितीत उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सतोष डाबेराव, मनसेचे तालुका अध्यक्ष मनोज तायडे, जेष्ठ पत्रकार गजानन देशमुख, संजय कदम, शिवर येथिल जेष्ठ नागरिक एकनाथ देशमुख, नितिन देशमुख, उपस्थित होते. उपतालुकाध्यक्ष पंकज कदम, लकी पाटील गावंडे, मनविसे अध्यक्ष प्रथमेश राऊत, संदिप झळके, राम शिंदे, पप्पु पाटील भारसकळे यांनी पुढाकार घेऊन कार्यक्रम यशस्वी घडविण्यास प्रयत्न केलेत. श्री. कुले यांनी उपस्थितांचेेे आभार मानले. सुरुची भोजनाने पत्रकार दिनाची सांगता झाली.

प्रतिक्रिया —-
“पत्रकार हा समाजाभिमूख व समाजशील असतो. समाजातील तळागाळातील नागरिकांच्या समस्या सोडविण्याचे काम पत्रकार तळमळीने करीत असतात. लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारांचा पत्रकार दिनाच्या निमित्ताने उचित सन्मान होणे गरजेचे आहे. “
मनोज तायडे ( तालुका अध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना, दर्यापूर )