दर्यापूर – महेश बुंदे
दर्यापूर तालुक्यातील येवदा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दिनांक ६ जानेवारी २०२२ रोजी आरोग्य विभाग व आय.सी.डी. एस. विभाग यांचे संयुक्त विद्यमाने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित एकपात्री नाट्यप्रयोग सौ. वैशाली प्रफुल्ल चऱ्हाटे यांनी सादर केला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष सौ. वंदनाताई करुले तर प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य सौ. संदया देशमुख, तहसीलदार श्री. योगेश देशमुख, डॉ. संजय पाटील, आय.सी.डी. एस. पर्यवेक्षिका चंद्रकला खेडकर, डॉ. गोपाळ श्रीसागर, डॉ. मदिहा अरीश, डॉ. मनोज कोंडे, उपस्थित होते.
या कार्यक्रमात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिलांचा शाल, श्रीफळ, प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. त्यामध्ये डॉ. मदिया, ललिता खोंड, आशा टेहरे, सौ. पडोळे, धनरेखा राठोड, भारती पिंजरकर, सौ. चंद्रकला खेडकर उपस्थित होत्या.
