प्रतिनिधी फुलचंद भगत
वाशीम:-समाजभान जपणार्या पत्रकारांमुळे समाजस्वास्थ्य टिकून आहे. पत्रकारिता हे समाज घडविणारे माध्यम आहे, असे भाष्य ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री नामदेव कांबळे यांनी दि.६ जानेवारी रोजी पञकारदिनी केले आहे.स्थानिक पत्रकार भवनात आयोजित पत्रकार दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
सदर कार्यक्रमाह जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष माधवराव अंभोरे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. लोकमतचे अकोला आवृत्ती संपादक किरण अग्रवाल, जिल्हा पोलिस अधीक्षक बच्चन सिंह, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, पत्रकार संघाचे जिल्हा सरचिटणीस विश्वनाथ राऊत यांची प्रमुख उपस्थिती होती.
