बहुजन रयत परिषदेच्या महिला प्रदेश अध्यक्षा , सौ. कोमलताई अजय साळुंखे (ढोबळे) यांना चाळकवाडी आळेफाटा येथील, टोल नाक्यावर असणाऱ्या कर्मचाऱ्यांनी दि. 20/12/2021रोजी भोसरी ते नाशिक प्रवास करत असताना अरेरावी केली तसेच त्रास दिला त्याबद्दल दिनांक22/12/2021रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या वाहतूक आघाडी, व्यापारी आघाडी ,मराठा आघाडी यांच्या वतीने पुणे जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन दिले होते.
त्या अनुषंगाने दिनांक 5 /1/ 2022 रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ,लहुजी टायगर युवामंच, महाराष्ट्र परिवर्तन सेना, नियती फाउंडेशन, बहुजन रयत परिषदेचे प्रमुख पदाधिकारी व महिला पदाधिकारी यांच्या संयुक्त शिष्टमंडळाने आळेफाटा (चाळकवाडी) टोल नाका येथील मुख्य कार्यालयास व आळेफाटा पोलीस स्टेशन ला भेट दिली कोमल ताई साळुंके( ढोबळे) यांच्याबरोबर जी काही त्यादिवशी घटना घडली होती त्या घटनेमध्ये दोषी असणारे कामगार यांच्यावर काय कारवाई केली व पुढील काळात महिला बरोबर व इतर प्रवाशाबरोबर अशी घटना होऊ नये, याकरिता आपण काय निर्णय घेतला आहे याची आम्हाला माहिती मिळावी याकरिता सर्व संघटनांच्या वतीने व पक्षाच्या वतीने, विचारणा केली असता संबंधित टोल नाक्यावरील देशमुख साहेब व आळेफाटा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मा. शिरसागर साहेब यांनी मध्यस्थी करून पुढील काळात कुठल्याही महिला बरोबर किंवा प्रवाशाच्या बरोबर अशाप्रकारे काहीही प्रकार होणार नाही याची आम्ही काळजी घेऊ.
