प्रतिनिधी फुलचंद भगत
वाशिम: भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी महिला अधिकाऱ्यांबद्दल केलेल्या वक्तव्याचा मंगरुळपीर येथील महिलांनी निषेध करत पडळकर यांच्यावर कारवाईची मागणी तहसिलदार आणी ठाणेदार यांना दिलेल्या लेखी निवेदनाव्दारे दि.६ जानेवारी रोजी केली आहे.
सांगली जिल्ह्याच्या अतिरिक्त पोलीस अधीक्षक या धुणे-भांड्याला जयंत पाटलांच्या घरी असल्यासारखे वागतात असे आक्षेपार्ह वक्तव्य पडळकर यांनी केले होते. या वक्तव्याचा निषेध करत धुणे भांडी करत असलेल्या महिलांच्या कामास व सर्व महिलांना हीन दर्जा देऊन संपूर्ण स्त्री वर्गाचा अपमान झाल्याची भावना यावेळी महाराष्ट्र घरकामगार मोलकरीन संघटनेच्या महिलांनी बोलून दाखवली.
