जिल्हाधिकारी पवनीत कौर यांच्याकडून आदेश जारी…
नववी ते बारावी सुरू; पण नियम बंधनकारक
अमरावती,ओम मोरे
दि. ६ : कोविड प्रतिबंधक उपाययोजनेत जिल्ह्यातील शाळांत इयत्ता पहिली ते आठवा वर्ग दि. 31 जानेवारीपर्यंत प्रत्यक्ष अध्ययन बंद ठेवून, केवळ ऑनलाईन शिक्षण सुरू ठेवण्याचा आदेश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अध्यक्ष जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी आज जारी केला.कोविड साथ व ओमायक्रॉन व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर साथ नियंत्रणासाठी हा निर्णय घेण्यात आला.
