Post Views: 402
स्वराज्य वार्ता प्रतिनिधी कुणाल शिंदे
पुणे :- खेड तालुक्यातील गोणवडी येथील वनविभागाच्या रोपवाटिकेला पाणी देण्यात येणारी विद्युत मोटार अज्ञात चोरट्यांनी रात्री भीमा नदीवरून चोरीला गेल्याचे आढळून आले आहे.याप्रकरणी चाकण पोलिसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गोणवडी येथील बाबासाहेब आंबेडकर रोपवाटिकेला तेथील वाचमन बबन मोहिते हे झाडांना पाणी व देखभाल करत असतात. त्या रोपवाटिला पाण्याचा पुरवठा करण्यासाठी भीमा नदीपात्रात जवळ ७.५० पाण्याची विद्युत मोटार बसविण्यात आले आहे.त्याद्वारे रोपवाटिकेतील झाडांना पाणी दिले जाते.मात्र दिनांक २५ डिसेंबर रोजी वाचमन हे संध्याकाळी ८ वाजता मोटर चालू करण्यासाठी गेले असता पाण्याची मोटर चालु झाली नाही, व मोटारीचा आवाज देखील आला नाही.
त्यामुळे त्यांनी हा प्रकार दुसऱ्या दिवशी वनपाल संतोष उंडे यांना सांगितला. त्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केल्यावर भीमा नदीकाठी मोटारीची केबल कापून टाकलेली दिसली.व पाण्याचा पाईप देखील कापल्याचे पाहून मोटार स्टँडवर नसल्याचे पाहिले. सदर मोटार कोणी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याचे दोघांना खात्री झाली. चोरून नेलेल्या मोटारीची किंमत 20,000 रुपये असुन अज्ञात चोरट्यांविरोधात वनपाल संतोष उंडे यांनी तक्रार दिली आहे.याप्रकरणी पुढील तपास चाकण पोलीस करत आहेत.