स्वराज्य वार्ता प्रतिनिधी कुणाल शिंदे
पुणे :- चाकण जवळील संतोष नगर भाम या ठिकाणी रिपॉस आई ओ टी इंडिया प्रायव्हेट या कंपनीत मीटरमध्ये अफरातफर करून वीजचोरी करत असल्याचे महावितरण अधिकारी यांना आढळून आले आहे. याप्रकरणी चाकण पोलिसात कंपनीचे मालक राजेंद्र वाळुंज महावितरण करून फिर्याद दाखल झाली आहे.

चाकण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वाकी येथील संतोष नगर भाम येथील रिपॉस आई ओ टी इंडिया प्रायव्हेट या कंपनीत महावितरण अधिकारी तपासणीसाठी गेले असता त्यांना मीटरमध्ये अफरातफर करून वीजचोरी होत असल्याचे निदर्शनास आले. सदर मीटर वरील विजजोडणी औद्योगिक वापरासाठी वापरले जात असुन त्यावर मंजुर भार १०५ HP एवढा आहे.मात्र मीटरमध्ये येणाऱ्या विजेची केबलमध्ये अफरातफर करून व त्याचे स्क्रू ढिले करून सदर कंपनीमध्ये विजचोरी मंदगतीने मिटरचे आकडे पडण्याची सोय करून ठेवण्यात आल्याचे आढळून आले. मीटरची तपासणी केली असता कंपनीत मागील २२ महिण्यापासून वीजचोरी होत असल्याने व सदर मीटर राजेंद्र दशरथ वाळुंज यांच्या नावाने नोंद असल्याचे महावितरण अधिकाऱ्यांनी सांगितले. सदर प्रकरणाचा अहवाल महावितरण अधिकारी यांनी कार्यालयाला सादर करून मागील २२ महिन्यापासून विजचोरीचे बिल २० लाख ६३ हजार ४१० रुपये बिल भरण्यास ग्राहकाला देण्यात आले. परंतु अजून देखील ते बिल कंपनीचे मालक राजेंद्र दशरथ वाळूंज यांनी भरले नाही. त्यामुळे महावितरण अधिकारी नरेंद्र रडे याप्रकरणी चाकण पोलिसात तक्रार दिली असुन विजवाहक कायदा 2003 नुसार कलम १३५ नुसार अदखलपात्र गुन्हा दाखल दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास चाकण पोलीस करत आहे.
