दर्यापूर – महेश बुंदे
तालुक्यातील श्री. दादासाहेब गवई चॅरिटेबल ट्रस्ट द्वारा संचालित रामकृष्ण कनिष्ठ महाविद्यालय दारापूर येथे ३ जानेवारी २०२२ रोजी रोज सोमवारला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती विविध स्पर्धेचे आयोजन करून उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमानिमित्त महाविद्यालयात पोस्टर प्रेझेंटेशन, रांगोळी स्पर्धा व पाककला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेत एकूण ५५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन आपली रांगोळी, पाककला व पोस्टर प्रदर्शनही सादर केली.

या स्पर्धेचे परीक्षक म्हणून प्रा. कु. कुर्मी व प्रा. कु. अंबुलकर उपस्थित होत्या. पोस्टर प्रदर्शनीमध्ये प्रथम क्रमांक वेदांत घुरडे, द्वितीय क्रमांक कु. मनश्री वानखडे तर तृतीय क्रमांक कु. दिव्या धंदर तसे प्रोत्साहनपर कु. राधा कावरे या विद्यार्थ्यांनी पटकाविला. रांगोळी स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक कु. सेजल इंगळे, द्वितीय क्रमांक कु. समीक्षा बनसोड तर तृतीय क्रमांक कु. दिव्या शेवतकर यांनी पटकाविला. पाककला स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक कु. आकांक्षा आढाव, द्वितीय क्रमांक कु. ऋतिका रूपनारायण, तृतीय क्रमांक कु. शिवनेरी दामले यांनी पटकाविला. सर्व विजेत्यांचे या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाच्या प्राचार्या कु. व्ही. बी. मोरशे, श्री. संत, श्री. केचे, श्री. सोनपराते, श्री. डोईफोडे, श्री. देशमुख, श्री. झोटिंग, श्री. भुरके, श्री. ढोके, श्री. मुळे, श्री. कोरडे, कु. ठाकरे, कु. रघुवंशी, कु. भडके, श्री. वानखेडे, कु. धांडे, श्री. वाघ, श्री. बेलसरे यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.
