Post Views: 442
स्वराज्य वार्ता प्रतिनिधी कुणाल शिंदें
पुणे :- कोरोनाच्या तिसऱ्या लाटेने देशात पुन्हा थैमान घातले आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाने कोरोना प्रतिबंधात्मक १५ ते १८ वयोगटातील मुलांचे व तरुणांचे लसीकरण मोहिम चालू देशात चालु केली आहे. महाराष्ट्रात देखील या योजनेचा शुभारंभ कऱण्यात आला आहे.खेड तालुक्यातील देखील कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम आरोग्य विभागाकडून हाती घेतली आहे.
या मोहिमेत तालुक्यातील मुलांचे लसीकरण तालुक्यातील शाळांमध्ये चालूं झाले आहे..शाळेतील ८ वी ते १२ वीच्या विध्यार्थ्यांना मोफत भारत बायोटेक कंपनीची कोवक्सिन लसीचे भारत सरकारने मान्यता दिलेले कोरोना लसीकरण शासनाकडून करण्यात येत आहे. खेड तालुक्यातील ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्राकडून हे लसीकरण पार पाडले जाणार आहे. तरी तरुणांनी व विध्यार्थ्यांनी कोरोनाची लस न घाबरता शाळेत जाऊन घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. उद्या दिनांक ६ /१/२०२२ रोजी तालुक्यातील खालील उच्च माध्यमिक, व माध्यमिक शाळेमध्ये लसीकरण होणार आहे.
हुतात्मा राजगुरू महाविद्यालय (राजगुरूनगर)
त्रिमुर्ती विद्यालय (तिन्हेवाडी)
सुमंत माध्यमिक विद्यालय
(ठाकुर पिंपरी)
मालुदेवी विद्यालय (वाळद)
शासकीय आश्रम शाळा (चिखलगाव)
न्यू इंग्लिश स्कूल (कोहिंडे बुद्रुक )
M.P.S.V.P विद्यालय (चांडोली)
आर्या माध्यमिक स्कूल (चांडोली)
श्री रेणुका माता माध्यमिक विद्यालय (रासे)
भैरवनाथ विद्यालय (कीवळे)
शासकीय आश्रम शाळा
(कोहिंडे खुर्द)
भैरवनाथ माध्यमिक विद्यालय ( कुरुळी )
श्री समर्थ इंग्लिश मेडिअम स्कूल ( कुरुळी )
आनंद इंग्लिश मेडिअम स्कूल ( कुरुळी )
संत मुक्ताबाई माध्यमिक विद्यालय ( सोळू )
होळकर विद्यालय (वाफगावं)
वरील शाळांमध्ये उद्या आरोग्य केंद्राकडून कर्मचाऱ्यांमार्फत लसीकरण होणार आहे. तरी सर्व मुलांनी शाळेत उपस्थित राहुन या कोविड १९ लस घेण्यात यावी.