वंचित बहूजन आघाडीच्या पश्चिम विदर्भ अध्यक्षपदी डॉ. सिध्दार्थ देवळे यांची नियुक्ती

प्रतिनिधी फुलचंद भगत


वाशिम – वाशिम येथील सु-प्रसिध्द हृदयरोग तज्ञ डॉ. सिध्दार्थ देवळे यांची वंचित बहूजन आघाडीच्या पश्चिम विदर्भ विभागाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. वंचित बहूजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशाने प्रदेश अध्यक्ष रेखा ठाकूर यांनी डॉ. देवळे यांची नियुक्ती जाहीर केली. यासंदर्भात स्थानिक मणिप्रभा हॉटेलमध्ये २ डिसेंबर रोजी झालेल्या बैठकीत वंचित बहूजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष गोविंद दळवी यांच्या हस्ते व प्रदेश सदस्या किरणताई गिर्‍हे, अकोला महासचिव बालमुकुंद भिरड, यवतमाळ उपाध्यक्ष लक्ष्मण पाटील, खामगाव उपाध्यक्ष शरद वसतकार,प्रा. भोजणे, प्रा. हुसे यांच्या उपस्थितीत डॉ. देवळे यांना नियुक्तीपत्र देवून सत्कार करण्यात आला.

जिल्ह्याच्या वैद्यकीय क्षेत्रासह सामाजिक व राजकीय क्षेत्रात सतत योगदान देवून कार्यरत राहणारे येथील हृदयरोग तज्ञ डॉ. सिध्दार्थ देवळे यांच्या कार्याची दखल घेवून त्यांची वंचित बहूजन आघाडीच्या पश्चिम विदर्भ अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. डॉ. देवळे यांनी वाशिम येथे सन २००६ मध्ये वैद्यकीय सेवेला प्रारंभ केला. योग्य निदान व यशस्वी उपचारामुळे ते अल्पावधीतच जिल्ह्यासह परिसरात परिचीत झाले. समाजसेवेची आवड असल्याने ते वैद्यकीय सेवेसोबतच सामाजिक व राजकीय क्षेत्राशी जोडल्या गेले. गत जि.प. निवडणूकीत त्यांनी वंचित बहूजन आघाडीच्या उमेदवारासाठी जिल्हाभर प्रवास करुन उमेदवारांना बळ दिले. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांचा विचार गावपातळीवर पोहचविण्यासोबतच संघटन मजबुत करण्यासाठी प्रयत्नशिल राहण्याची ग्वाही यावेळी डॉ. देवळे यांनी आपल्या नियुक्ती नंतर दिली.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!