Post Views: 411
प्रतिनिधी सुनील बटवाल/चिंबळी
चिंबळी दि३ (वार्ताहर) खेड तालुक्यातील दक्षिण भागातील विविध भागांतील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तसेच ग्रामपंचायतीच्या व विविध संस्थांच्या वतीने सावित्रीबाई फुले यांची जयंती व बालिका दिन साजरी करण्यात आली.
भारतातील पहिल्या महिला शिक्षिका व मुख्याध्यापिका स्त्री शिक्षणाच्या प्रणेता शिंदेंची जननी व समस्त स्त्रियांना उजेडात वाट दाखविणा-या क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त कुरुळी येथील ग्रामपंचायतीच्या व प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या वतिने सरपंच कविता गायकवाड उपसंरपच विशाल सोनवणे ग्रामविकास अधिकारी कविता कोतवाल युवा उद्योजक अजित गायकवाड यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले तर जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेच्या वतीने मुख्याध्यापिका शोभा सुतार व सर्व शिक्षकांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला .