Post Views: 373
प्रतिनिधी -सुनील बटवाल/ चिंबळी
चिंबळी दि३( वार्ताहर) भारतातील पहिल्या महिला शिक्षिका व मुख्याध्यापिका स्त्री शिक्षणाच्या प्रणेता शिंदेंची जननी व समस्त स्त्रियांना उजेडात वाट दाखविणा-या क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त मोई येथील ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच शिलाताई रोकडे उपसंरपच शितल गवारे व सर्व सदस्यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले .
यावेळी माजी आदर्श सरपंच राहुल गवारे उपसरपंच सचिन येळवडे किरण गवारे सदस्य विश्वनाथ गवारे कैलास साकोरे पोलीस पाटील नारायण बिडकर जेष्ठ समाजसेवक चिंतामण रोकडे बाळासाहेब बिडकर संतोष रोकडे ग्रामसेवक भास्कर विर सर्व सदस्य व कर्मचारी वर्ग उपस्थित होते .