Post Views: 463
प्रतिनिधी सुनील बटवाल/चिंबळी
चिंबळी दि२९ ( वार्ताहर)( ता खेड)येथील विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थेच्या चेअरमन (अध्यक्ष) पदी ज्ञानेश्वर सदाशिव कड यांची दुस-रादा बिनविरोध निवड झाली असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी जे बी मुलांनी व सचिव निलेश देशमुख यांनी सांगितले .
चिंबळी (ता खेड) येथील विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थेच्या सर्व संचालक मंडळांना काम करण्याची संधी मिळावी या हेतूने चेअरमन हिरामण जैद यांनी स्वखुशीने राजीनामा दिला असल्याने या रिक्त जागेसाठी खेड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात निवडणूक निर्णय अधिकारी जे बी मुलांनी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थेच्या अध्यक्ष पदा साठी सर्वानुमते संचालक ज्ञानेश्वर कड यांचा एकमेव अर्ज दाखल करून सुचक म्हणून माजी सभापती व संचालक विलास कातोरे यांनी स्वाक्षरी केली तर अनुमोदन म्हणून मावळते अध्यक्ष हिरामण जैद यांनी स्वाक्षरी केली .
यावेळी माजी माजी सरपंच अर्जुन अवघडे चेअरमन अर्जून जाधव बाळासाहेब बर्गे व्हायचेअरमण संतोष सोनवणे सावित्रीबाई बटलाल बेबी अवघडे माजी व्हायचेअरमण अंकुश बटवाल संभाजी अवघडे अनिल कातोरे आदि मान्यवर उपस्थित होते यावेळी नवनिर्वाचित चेअरमन ज्ञानेश्वर कड यांचा माजी सभापती विलास कातोरे व निवडणूक निर्णय अधिकारी जे बी मुलांनी यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी सर्व संचालक व आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते .