दर्यापूर – महेश बुंदे
अभ्यासाच्या व्यापातून दुरावलेली ही चित्रकला अचानकपणे लॉकडाऊनकाळात जागरूक झाली आणि त्यानंतर दररोज एक याप्रमाणे पेन्सिलच्या माध्यमातून राजकारण्यांसह, पत्रकारांची रेखाचित्रे रेखाटण्यात तो दंग झाला. चित्रकलेचे कुठलेही प्रशिक्षण न घेता या बाल चित्रकाराने आपल्या पेन्सिलमधून दर्यापूर अंजनगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार बळवंत वानखडे, अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष तथा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सुधाकर पाटील भारसाकळे, जेष्ठ पत्रकार गजानन देशमुख यांची बहारदार चित्रे साकारली.
