नांदगाव खंडेश्वर प्रतिनिधी :- जाहिद खान
कॉम्रेड अर्धेंदु भूषण बर्धन यांचा सहावा स्मृतीदिन भारतीय कम्युनिस्ट पक्ष कार्यालय नांदगाव खंडेश्वर येथे संपन्न झाला.भाकपचे राज्य सचिव कॉ. तुकाराम भस्मे यांच्या हस्ते त्यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून र्स्मृतिदिन साजरा करण्यात आला.
यावेळी जिल्हा सचिव सुनील मेटकर, संजय मंडवधरे प्रामुख्याने उपस्थित होते.बर्धन यांचा जन्म 25 सप्टेंबर 1924 रोजी झाला तर त्यांच2 जानेवारी 2016 रोजी दिल्ली येथे निधन झाले.बर्धन यांनी संपूर्ण हयात देशातील गोरगरीब, श्रमिक, कष्टकरी,शेतकरी,शेतमजूर यांच्या कल्याणासाठी व हितासाठी घालवली आहे.ते भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे व ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस महासचिव होते.
