सामाजिक सुरक्षा विभाग पथकाने अवैधरित्या स्पा सेंटरच्या नावाखाली आठ महिलांकडुन जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करवुन घेणाऱ्या दोन जणांनविरुध्द तसेच अवैधरित्या विदेशी दारुच्या व बियरच्या बाटल्याची वाहतूक करणाऱ्या व बंदिस्त जागेत व्हिडीओ गेम पार्लरमध्ये जुगार खेळणाऱ्या व खेळविणाऱ्यावर कारवाई “

सामाजिक सुरक्षा विभाग यांचे पथकाने अवैधरित्या स्पा सेंटरच्या नावाखाली आठ महिलांकडुन जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करवुन घेणाऱ्या दोन इसमांविरुध्द तसेच अवैधरित्या विदेशी दारुच्या व बियरच्या बाटल्याची वाहतूक करणाऱ्या व बंदिस्त जागेत व्हिडीओ गेम पार्लरमध्ये जुगार खेळणाऱ्या व खेळविणाऱ्या इसमांवर कारवाई केलेबाबत.”

मा. पोलीस आयुक्त श्री कृष्ण प्रकाश पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय यांनी पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये अवैध धंद्यावर प्रतिबंध करण्याच्या अनुषंगाने माहिती काढुन कारवाई करणेबाबत आदेश दिल्याने सामाजिक सुरक्षा पथक हे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये अवैध धंद्यावर कारवाई करण्याच्या अनुषंगाने गोपनिय माहिती काढत असताना दिनांक ३१/१२/२०२१ रोजी सांगवी पोलीस स्टेशन हदीत स्पा सेंटरच्या नावाखाली महिलांकडून वेश्याव्यवसाय करवुन घेणाऱ्या तसेच विनापरवाना अवैधरित्या विदेशी दारुच्या व बियरच्या बाटल्या ताब्यात बाळगुन वाहतूक करणाऱ्या व वाकड पोलीस स्टेशन हद्दीत अवैधरित्या लॉटरी सेंटरमध्ये जुगार खेळणाऱ्या व खेळविणाऱ्या इसमांवर कारवाई करण्यात आली आहे.

दिनांक ३१/१२/२०२१ रोजी सामाजिक सुरक्षा पथक व अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचे पथकातील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी सांगवी पोलीस स्टेशन हद्दीतील ब्रिडल स्पा अॅण्ड ब्युटी फ्लॅट नंबर ११, दुसरा मजला, शाहू पॅलेस, किर्तीनगर, कृष्णा चौक, नवी सांगवी, पुणे येथे स्पा सेंटरचा चालक मालक पार्थ महंती तसेच स्पा सेंटरचा मॅनेजर नामे शेख लतीफ है महिलांकडून स्पा सेंटरच्या नावाखाली जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करवून घेत घेतात. वेश्यागमनासाठी स्पा सेंटर चालक-मालक व मॅनेजर हे प्रतिग्राहक २,५००/ ने ३,०००/- रु घेतात व त्यातून महिलांना वेश्यागमनाचा गोबदला म्हणुन प्रत्येकी १,०००/- रु देवुन रु ते वेश्याव्यवसाय चालवितात.

अशी गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या गोपनिय माहितीवरून सामाजिक सुरक्षा पथक अनैतिक मानवी या वाहतूक प्रतिबंध कक्षाचे पथकातील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी सांगवी पोलीस स्टेशन हद्दीत सायंकाळी १६:१० वा चे सुमारास स्पा सेंटरमध्ये डिकॉय कस्टमर पाठवुन वेश्या व्यवसाय चालतो अशी खात्री होताच सापळा रचुन छापा टाकून एकुन ०८ पिडीत महिलांची त्यामध्ये ०३ नेपाळ या परदेशातील टाकुर राज्यातील महिला, आसाम, पश्चिम बंगाल, दिल्ली या पर महिला व राज्यातील ०१ अशा एकुण ०८ पिडीत महिलांची वेश्याव्यवसायातुन सुटका करण्यात आली असून त्यांना महिला सुधारगृह हडपसर, पुणे येथे ठेवण्यात प आले आहे व खालील मुद्देमाल आरोपीच्या ताब्यातुन जप्त केला त्याचे वर्णन खालीलप्रमाणे आहे.

१) ८,३००/- रु रोख रक्कम २)३७/-रुकिंचे इतर साहित्य,३) १५,०००/- रुकिचे ०२ अॅण्ड्रॉईड मोबाईल,

असा एकुण २३,३३७/- रुकिंचा मुद्देमाल मिळुन आला म्हणुन इसम नामे १) शेख लतीफ निजाम वय २७ वर्षे (स्पा मॅनेजर) रा. चवण हिप्परगा ता. देवणी जि. लातूर सध्या रा. सतिश देशमुख यांचे माझ्याचे रुममध्ये, ज्ञानदिप कॉलनी, कुणाल हॉटेलच्या पाठीमागे, काळेवाडी, पुणे तसेच पाहिजे आरोपी नामे २) पार्थ सारथी महंती वय अंदाजे ३६ वर्षे रा ब्रिडल स्पा अॅण्ड ब्युटी फ्लॅट नंबर ११ दुसरा मजला, शाहु पॅलेस, किर्तीनगर, कृष्णा चौक, नवी सांगवी पुणे येथे स्पा सेंटरमध्ये मुळपता श्रीरंगपूर, पोस्ट श्रीजंग जि. बालासुर पोलीस स्टेशन खांतापाडा राज्य ओडीसा यांचेविरुध्द सांगवी पोलीस स्टेशन येथे ०१ / २०२२ अनैतिक व्यापारास प्रतिबंध अधिनियम १९५६ चे कलम ३,४,५ सह भादंवि कलम ३७०(३) ३४ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सांगवी पोलीस स्टेशन करीत आहे.

तसेच दिनांक ३१/१२/२०२१ रोजी सामाजिक सुरक्षा विभागाचे दुसऱ्या पथकातील पोलीस अधिकारी क पोलीस अंमलदार यांनी समर्थनगर, नवी सांगवी, पुणे येथुन एक तीनचाकी रिक्षा त्याचा क्रमांक एमएच १२ एस के ०३०१ या वाहनातुन एक इसम हा कोणताही दारुविक्रीचा परवाना नसताना विदेशी दारुच्या व बियरच्या बाटल्या ताब्यात बाळगुन त्याची विक्री करीता वाहतूक करीत आहे. अशी गुप्त बातमीदारकडून मिळालेल्या गोपनिय माहितीवरुन सामाजिक सुरक्षा विभागाचे पथकातील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी सांगवी पोलीस स्टेशन हद्दीत सापळा रचुन १५:४० वा चे सुमारास छापा टाकुन खालील मुद्देमाल आरोपीच्या ताब्यातुन जप्त केला त्याचे वर्णन खालीलप्रमाणे आहे.

१) ४२,३४५/- रु किं च्या विदेशी दारुच्या व बियरच्या बाटल्या २) १,७५,०००/- रुकिंचा एमएच १२ एस के ०३०१ क्रमांकाचा तीनचाकी रिक्षा जु.वा. किं.अं.

असा एकुण २,१७,३४५ रु कि चा मुद्देमाल मिळुन आला म्हणुन इसम नामे १) सुशांत धर्मा काशिद वय ५० वर्षे धंदा अस्मिता हॉटेल फेमस चौक, सांगवी, पुणे रा. गणेशनगर, गणेश बिल्डींग, फेमस चौक, नवी सांगवी, पुणे (दारु मालक) २) उतरेश्वर वसंत सोनवणे वय २७ वर्षे रा. धावडेवस्ती दत्तात्रय चव्हाण यांचे घर, अनाजी वस्ती, मराठी शाळेजवळ, मांजरी बु. पुणे (रिक्षा चालक) तसेच पाहिजे आरोपी ३) सम्राट वाईन्स कृष्णा बझार चौक, नवी सांगवी, पुणे (चालक-मालक) यांनी वाईनशॉपमधुन लायसन्स परवाना नियम अटी शर्तीचे उल्लंघन करुन मोठ्या प्रमाणात नियमापेक्षा अधिक दारु विक्री केली म्हणुन त्यांचेविरुध्द सांगवी पोलीस स्टेशन येथे गुरनं ५७०/२०२१ महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम १९४९ कलम ६५(ई), ८२, ८३ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला असुन पुढील तपास सांगवी पोलीस स्टेशन करीत आहे.

तसेच दिनांक ३१/१२/२०२१ रोजी सामाजिक सुरक्षा विभागाचे पथकातील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी वाकड पोलीस स्टेशन हद्दीत भोईर इस्टेट वाकड रोड, डांगे चौक, वाकड, पुणे येथील रॉयल व्हिडीओ गेम पार्लरमध्ये इसम नामे माऊली साळुंखे हा अवैधरित्या स्वतःचे आर्थिक फायद्यासाठी व्हिडीओ गेम पार्लरमध्ये गिन्हाईकांना मास्टर, मेगा फ्रि प्ले दिन या व्हिडीओ गेम मशीनवरील आकड्यावर पैसे लावण्यास सांगुन स्वतःचे आर्थिक फायद्यासाठी जुगार खेळत व खेळवित आहे. अशी गुप्त बातमीदारकडून मिळालेल्या गोपनिय माहितीवरून सामाजिक सुरक्षा विभागाचे पथकातील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी वाकड पोलीस स्टेशन हद्दीत सापळा रचुन १५:५० वा चे सुमारास छापा टाकुन खालील मुद्देमाल आरोपीच्या ताब्यातुन जप्त केला त्याचे वर्णन खालीलप्रमाणे आहे.

१) ४,६००/- रु रोख रक्कम २) ५०,०००/-रुकिं च्या विविध कंपनीच्या ०५ व्हिडीओ गेम मशीन

असा एकुण ४,६००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल मिळुन आला म्हणुन इसम नामे १) गणेश बालाजी धनेराव वय २६ वर्षे रा. विठ्ठल कृपा बिल्डींग, गणेशनगर, एकता कॉलनी, वाकड, पुणे (व्हिडीओ गेम चालक) २) समीर दामोदर मानकर वय ३८ वर्षे रा. सुदर्शन कॉलनी, कैलासनगर, थेरगांव, पुणे (जुगार खेळणारा इसम) यांचेविरुध्द वाकड पोलीस स्टेशन येथे गुरनं ११०५/२०२१ महाराष्ट्र जुगार अधिनियम १९४९ चे कलम ४५ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला असुन पुढील तपास वाकड पोलीस स्टेशन करीत आहे. वरील तीनही कारवाईमध्ये एकुण २,९५,२८२/- रु किं चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सदरची कामगिरी मा. पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, मा. अप्पर पोलीस आयुक्त श्री. डॉ. संजय शिंदे, मा. पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) काकासाहेब डोळे, मा. सहा. पोलीस आयुक्त डॉ. प्रशांत अमृतकर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री देवेंद्र चव्हाण, सपोनि डॉ. अशोक डोंगरे, पोउपनि प्रदिपसिंग सिसोदे, पोउपनि धैर्यशिल सोळंके, पोलीस अंगलदार विजय कांबळे, किशोर पढेर, संतोष बर्गे, सुनिल शिरसाट, मारुती करचुंडे, योगेश तिडके, गणेश कारोटे, भगवंता मुठे, अतुल लोखंडे, अमोल साडेकर, संगिता जाधव, सोनाली माने, यांनी केली आहे.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!