हॉटेलमध्ये ग्राहकांना तंबाखूजन्य हुक्का पिण्यास उपलब्ध करुन देणाऱ्या व कोरोना विषयक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या हॉटेल व्यवसायीकांवर पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश व त्यांचे टिमसह छापा मारुन कारवाई
हॉटेलमध्ये ग्राहकांना तंबाखूजन्य हुक्का पिण्यास उपलब्ध करुन देणाऱ्या व कोरोना विषयक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या हॉटेल व्यवसायीकांवर पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश व त्यांचे टिमसह छापा मारुन कारवाई
“ नवीन वर्षाच्या स्वागतासाठी हॉटेलमध्ये ग्राहकांना तंबाखूजन्य हुक्का पिण्यास उपलब्ध करुन देणाऱ्या व कोरोना विषयक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या हॉटेल व्यवसायीकांवर पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी त्यांचे टिमसह छापा मारुन कारवाई केलेबाबत “
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीत ३१ डिसेंबर निमीत्ताने पिंपरी चिंचवड शहरातील हिंजवडी भागात हॉटेलमध्ये ग्राहकांना तंबाखूजन्य हुक्का पिण्यास उपलब्ध करुन देणाऱ्या व कोरोना विषयक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या हॉटेल व्यवसायीकांवर मा. पोलीस आयुक्त श्री कृष्ण प्रकाश यांनी त्यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे सापळा रचुन छापा टाकुन कारवाई करण्यात आली आहे.
दिनांक ०१/०१/२०२२ रोजी हिंजवडी पोलीस स्टेशन हद्दीत सर्वे नंबर १४१/१/१ जयरामनगर, हिंजवडी, पुणे येथील H20 नावाचे हॉटेलमध्ये इसम नामे जुनेद अन्सारी व तुषार सबलोक हे हॉटेलमधील टेरेसवर विनापरवाना अवैधरित्या स्वतःचे आर्थिक फायद्यासाठी लोखंडी पत्र्याचे शेड मारुन टेबल खुर्च्या • लावुन तेथे लोकांची गर्दी जमवुन त्यांना प्रतिबंधीत तंबाखूजन्य हुक्का पिणेस जागा उपलब्ध करुन देवुन हुक्का विक्री करीत आहेत.
अशी गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे मा. पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी त्यांचे टिमसह हॉटेलमध्ये रात्री ००:०५ वा चे सुमारास अतिशय शिताफीने सापळा रचुन छापा टाकला असता सदर ठिकाणी महाराष्ट्र शासनाने कोरोना विषाणू संसर्ग साखळी तोडण्यासाठी सांयकाळी ०६:०० वा नंतर पाच किंवा त्यापेक्षा अधिक लोक एकत्र येण्यास बंदीचे आदेश असताना देखील हॉटेल चालकांनी हॉटेलमध्ये उपलब्ध आसन क्षमतेच्या फक्त ५० टक्के क्षमतेने आस्थापना सुरु ठेवणे आवश्यक असताना नियमांकडे दुर्लक्ष करून हॉटेलमध्ये लोकांची गर्दी जमवुन स्वतःचे आर्थिक फायद्यासाठी लोकांना प्रतिबंधीत तंबाखूजन्य हुक्का फ्लेवर्स विक्री करीता उपलब्ध करून देताना मिळुन आल्याने आरोपीच्या ताब्यातुन खालील मुद्देमाल जप्त करण्यात आला त्याचे वर्णन खालीलप्रमाणे आहे.
एकुण २,३९,८००/- रुकि चा मुद्देमाल त्यामध्ये
१) ६०,०००/- रु रोख रक्कम
२) ५,६५०/- रु किं चे हुक्का फ्लेवर
(३) १,७२,५००/- रुकि चे हुक्का पिणेसाठी लागणरे हुक्का पाँट पाईपसह. ४) १,५५०/- रुकिं चे हुक्का पिणेसाठी लागणारे इतर साहित्य,
अशा वर्णनाचा मुद्देमाल मिळुन आल्याने इसम नामे १) तुषार प्रमोद सबलोक वय ३४ वर्षे रा. लाईफ रिपब्लिक आर/७ एफ १८०४ मारुंजी, हिंजवडी, पुणे (हॉटेल मालक) २) जुनेद असगर अन्सारी य ३४ वर्षे रा. फ्लॅट नंबर २४. एफ बिल्डींग दुरानी कॉम्पलेक्स मिठानगर, कोढवा, पुणे (हॉटेल चालक) ३) सुरेश गंगाजल राठोड वय २६ वर्षे रा. जयरामनगर, हुलावळे चाळ, हिंजवडी, पुणे (बार टेंडर) ४) अशराफुल आसान शेख वय २३ वर्षे रा. जयरामनगर, हुलावळे चाळ, हिंजवडी, पुणे (कॅप्टर) ५) दिवाकर श्रीमहेश झा वय ३६ वर्षे रा. जयरामनगर, हुलावळे चाळ, हिंजवडी, पुणे (वेटर) ६) राखीबुल इसराफुल शेख वय २२ वर्षे रा. जयरामनगर, हुलावळे चाळ, हिंजवडी, पुणे (वेटर) ७) छोटन लालमोहम्मद शेख वय २५ वर्षे रा. जयरामनगर, हुलावळे चाळ, हिंजवडी, पुणे (वेटर) यांचेविरुध्द हिंजवडी पोलीस स्टेशन येथे गुरनं ०१ / २०२२ भादंवि कलम १८८,२६९ २७० २८५, ३४ साथीच्या रोग अधिनियम १८९७ चे कलम ३. राष्ट्रीय आपती अधिनियम २००५ चे कलम ५१ (ब) महाराष्ट्र कोव्हीड १९ उपाययोजना २०२० चे कलम ११तसेच सिगारेट व अन्य तंबाखूजन्य उत्पादने अधिनियम (महाराष्ट्र सुधारणा) अधिनियम २०१८ चे कलम ४ अ, २१ अ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास हिंजवडी पोलीस स्टेशन करीत आहे. तसेच हॉटेलमध्ये गर्दी जमवुन नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ६१ इसमांवर प्रत्येकी ५००/- रु प्रमाणे दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
सदरची कामगिरी मा. पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांचेसह त्यांचे सामाजिक सुरक्षा • पथकातील पोलीस निरीक्षक श देवेंद्र चव्हाण, सपोनि डॉ. अशोक डोंगरे, पोउपनि प्रदिपसिंग सिसोदे, पोउपनि धैर्यशिल सोळंके पोलीस अंगलदार विजय कांबळे, किशोर पढेर, सुनिल शिरसाट, संतोष बर्गे, स्वप्निल खेतले, भगवंता मुठे, अमोल साडेकर, मारुती करचुंडे, गणेश कारोटे, संगिता जाधव, अतुल लाखंडे, योगेश तिडके, सोनाली माने, अमोल शिंदे, सुमित डमाळ यांनी केली आहे.