प्रतिनिधी फुलचंद भगत
वाशिम:- दि.02.01.2021 रोजी रेझिग डे सप्ताह निमीत्त पोलिस स्टेशन अनसिंग हद्दीतील कर्तव्यदक्ष ठाणेदार नैना पोहेकर यांच्या नेतृत्व आणी मार्गदर्शनात अनसिंग टाऊन मधील प. दि. जैन विद्यालय येथे कराटे प्रशिक्षण घेणारे विद्यार्थी तसेच त्यांचे पालकवर्ग यांना पो.स्टे. येथे पोलिस कामकाजाबाबत, तसेच पो. स्टे. परिसर ,cctns, विषयी माहिती देण्यात आली . कराटेचे प्रशिक्षक व त्यांचे 50 विद्याथी कार्यक्रम ला उपस्थित होते.

सदरचा कार्यक्रम सकाळी 10.00 वा.वाजता सूरु होऊन 12/00 वा दरम्यान घेण्यात आला.आलेले विद्याथी यांनी कराटेचे प्रात्याक्षिक करुन दाखविले तसेच त्याना शस्त्र बाबत,पो.स्टे कामकाजा बाबत माहिती दिली, तसेच त्याना लैंगिक छळ होऊ नये, या बाबत समुपदेशन केले, पालक वर्ग यांना हेल्मेट वापरने बाबत सुचना दिल्या, राज्य पातळीवर विजयी झालेल्या विद्यार्थींचा सत्कार घेण्यात आला. तसेच कार्यक्रमाचे शेवटी चहा नाश्ता बिस्किट वाटप करण्यात आला.

अनसिंग येथे पोलिस स्थापना दिनानिमित्य रेझिंग डे ऊत्साहात साजरा;विविध ऊपक्रमाचेही नियोजन केले होते.वाशिम जिल्ह्यातील अनसिंग पो.स्टे.च्या वतीने पोलिस स्थापना दिनाच्या औचित्याने ‘रेझिंग डे’ ऊपविभागीय पोलिस अधिकारी श्री.यशवंत केडगे यांच्या मार्गदर्शनात आणी ठाणेदार नैना पोहेकर यांच्या नेतृत्वात रेझिंग डे साजरा करन्यात आला.दिवंगत पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी २ जानेवारी १९६१ रोजी महाराष्ट्र पोलिस विभागास ध्वज सुपूर्त केला होता. त्या दिनानिमित्त महाराष्ट्र पोलिस विभागाच्या वतीने अनसिंग पो.स्टे.मध्ये रेझिंग डे ऊत्साहात साजरा झाला.तसेच हा सप्ताह रेझिंग झे म्हणून साजरा केला जात आहे. त्यानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
