श्री संत गाडगेबाबांचे अंतिम श्रध्दास्थान असलेल्या नागरवाडी इंद्रभुवनात बापुसाहेब देशमुख यांचा अभिष्टचिंतन सोहळा संपन्न

बातमी संकलन – महेश बुंदे

जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुलें। तो चि साधु ओळखावा देव तेथें चि जाणावा ॥ या उक्तीला अनुसरून संपुर्ण जगाला महानतेचा संदेश देणारे कर्मयोगी वैराग्यमुर्ती, संत गाडगेबाबांच्या विचारांचे पाईक असलेले कै. अच्युतराव देशमुख यांच्या सेवाकार्याचा वसा लाभलेले, श्री संत गाडगेबाबांच्या सेवाकार्याचे निष्कामसेवक तसेच आपल संपुर्ण आयुष्य खऱ्या अर्थाने श्री संत गाडगेबाबांच्या संदेशानुसार गोरगरीब, अंध, अपंग, कुष्ठरोगी निराश्रीतांना मायेचा आधार देणारे तसेच मेळघाटसारख्या अतिदुर्गंम भागातील आदिवासी, वनवासी समाजबांधव व विद्यार्थ्यांकरीता आपला देह चंदनासारखा झिजवणारे, नागरवाडी इंद्रभुवनाचे शिल्पकार तसेच श्री संत गाडगे महाराज मिशन मुंबईचे उपाध्यक्ष श्री.बापुसाहेब देशमुख यांचा अभिष्टचिंतन सोहळा श्री संत गाडगेबाबांचे अंतिम श्रध्दास्थान असलेल्या, नागरवाडी इंद्रभुवनात आश्रमशाळेतील मुलांसमवेत साजरा करण्यात आला.

या शुभप्रसंगी बापुसाहेब देशमुख यांच्या शुभहस्ते श्री बाबांच्या प्रतिरुप सेवार्थ प्रचारवाहन व श्री बाबांच्या मुर्तिचे महापुजन माल्यार्पण करत या आनंदउत्सवाची सुरुवात करण्यात आली. दरम्यान आश्रमशाळेतील विद्यार्थी मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व सेवक मंडळी, तसेच अमरावती येथिल श्री गाडगेबाबा समाधी मंदिराचे व्यवस्थापक प्रकाश महात्मे, गजानन जवंजाळ, माजी मुख्याध्यापक किशोर चौधरी यांनी नागरवाडीचे विश्वकर्मा असलेले श्री. बापुसाहेब देशमुख व सौ.वंदनाताई देशमुख यांचे शाल श्रीफळ देत “इंद्रभुवन केले नागरवाडीचे बापुंचे झाले सार्थक या जन्माचे ” या भावनामय गीतात स्वागत केले. दरम्यान बापुसाहेब देशमुख यांनी आश्रमशाळेतील मुलांसमवेत केक कापत ममतेची माया देत आपल्या हस्ते मुलांना केक भरविला. तसेच या आनंदमयप्रसंगी श्री. पिनलजी भोजने अमरावती यांनी आदिवासी गोरगरीब मुलांसोबत आपला वाढदिवस साजरा केला.

यावेळी मुलांना शैक्षणिक साहित्य बिस्कीटचे वितरण करत समाजासमोर एक चांगला आदर्श ठेवला. दरम्यान शाळेचे माजी मुख्याध्यापक श्री किशोर चौधरी यांनी बापुसाहेबांच्या सेवाकार्याला उजाळा देत, श्री बाबांच्या कल्पनेतील नागरवाडीचे इंद्रभुवन साकरण्यात संपुर्ण आयुष्य समर्पित केले अशा सद्भावना याप्रसंगी व्यक्त केल्या. प्रामुख्याने या अभिष्टचिंतन सोहळा व नुतन वर्षाच्या निमीत्ताने वरुड लोणी येथिल माजी सैनिक गजानन बोरकुटे, सेवानिवृत्त शिक्षक ज्ञानेश्वर पापडकर, तसेच अतुल पाचगरे यांचेकडून मुलांना भेट म्हणुन सुंदर पिण्याच्या पाण्याच्या बॉटल्स, शैक्षणिक साहित्य, जिलेबी, मोतीचूर लाडूंचे मिष्टान्न देण्यात आले. तसेच या कार्यक्रमाला कौशल्यादेवी चॅरीटेबल ट्रस्टचे अध्यक्ष श्री. रामुशेठ उर्फ रामेश्वर मालपाणी, श्री. शशांक देशपांडे अध्यक्ष पावर ऑफ मिडीया, क्रिडा शिक्षक संतोष मिसाळ दर्यापुर, बालक आश्रमाचे व्यवस्थापक गजानन देशमुख, पत्रकार सुयोग गोरले, मनोहर भिसने आदि मान्यवर उपस्थित होते तसेच या कार्यक्रमाचे संयोजन श्री सागर देशमुख व शाळेचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व सेवक मंडळी यांनी केले. सर्वांनी स्नेहभोजनाचा आनंद घेत या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. यावेळी नागरवाडी इंद्रभुवनात खऱ्या अर्थाने आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!