प्रतिनिधी फुलचंद भगत
वाशिम:-जिल्ह्यातील मंगरुळपीर पो.स्टे.च्या वतीने पोलिस स्थापना दिनाच्या औचित्याने ‘रेझिंग डे’ ऊपविभागीय पोलिस अधिकारी श्री.यशवंत केडगे यांच्या मार्गदर्शन आणी प्रमुख ऊपस्थीतीत आणी ठाणेदार श्री.धनंजय जगदाळे यांच्या नेतृत्वात रेझिंग डे साजरा करन्यात आला.
दिवंगत पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी २ जानेवारी १९६१ रोजी महाराष्ट्र पोलिस विभागास ध्वज सुपूर्त केला होता. त्या दिनानिमित्त महाराष्ट्र पोलिस विभागाच्या वतीने मंगरुळपीर पो.स्टे.मध्ये रेझिंग डे ऊत्साहात साजरा झाला.

तसेच हा सप्ताह रेझिंग झे म्हणून साजरा केला जात आहे. त्यानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. २४ तास ऑन ड्युटी असणाऱ्या पोलिसांचे कामकाज कसे चालते याविषयी विद्यार्थ्यांना, सर्वसामान्य लोकांना माहिती व्हावी, यासाठी ऊपविभागिय पोलिस अधिकारी श्री.यशवंत केडगे यांच्या मार्गदर्शनात ‘भेट पोलिस स्टेशनला’ हा उपक्रम पोलिस ऊपविभागात हाती घेण्यात आला आहे. यात ऊपविभागातील प्रत्येक पोलिस स्टेशनअंतर्गत असलेल्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या पोलिस ठाण्यांना भेट आयोजित केल्या आहेत. त्यांना पोलिस खात्याच्या कामकाजाविषयी माहिती देण्यात येणार आहे. त्याचबरोबर पोलिसांकडील शस्त्रसाठ्याचे प्रदर्शनही भरविण्यात येणार आहे.पोलिस स्टेशन हद्दीतील शैक्षणिक संस्थांना भेट देऊन विद्यार्थ्यांना वाहतुकीचे नियम व अन्य कायद्यांविषयी मार्गदर्शन पोलिस विभाग करणार आहे. महिलांवरील अत्याचार व स्त्रीभ्रूण हत्या जनजागृतीविषयक चर्चासत्रा घेण्यात येणार आहे. हा कार्यक्रम पोलिस उपविभागीय कार्यालयाअंतर्गत होणार आहे.दि.२ जानेवारीला पोलिस स्टेशन मंगरुळपीर येथे शांतता समितीच्या बैठकीचे आयोजन केले होते.
