भागवत धर्म प्रचारक तथा दर्यापूर मधील संत गाडगेबाबा स्मारक समितीचे विश्वस्त डॉक्टर पांडुरंग गुल्हाने यांचे वयाच्या नव्वदाव्या वर्षी निधन झाले. दर्यापूर मधील जुनी तहसील भागात त्यांचे वास्तव्य होते.
वयाच्या अठराव्या वर्षी पासून त्यांनी पंढरीची वारी सुरू केली होती यानंतर त्यांनी स्वतःला भागवत धर्माच्या प्रचार कार्यात वाहून घेतले विश्व हिंदू परिषदेच्या जिल्हा प्रमुख पदावर सुद्धा त्यांनी बरेच वर्ष कार्य केले राम जन्मभूमी आंदोलनात त्यांचा सक्रिय सहभाग होता वर्षातून एक वेळा ते अयोध्या येथे जाऊन श्रीरामाच्या दर्शन घेत असत दर्यापूरातील श्री संत गाडगेबाबा स्मारक समितीचे ते विश्वस्त होते. या स्मारक समितीच्या माध्यमातून प्रतिवर्षी भागवत धर्माशी संबंधित असणाऱ्या कीर्तनकारांना दर्यापूरमध्ये पाचारण करून त्यांच्या किर्तन सेवेचा लाभ ते परिसरातील लोकांना देत असत नियमित हरिपाठ कीर्तन भजन ही त्यांची दिनचर्या होती भागवत धर्माचा संपूर्ण महाराष्ट्रात प्रचार करण्यासाठी त्यांनी आयुष्य वेचले डॉक्टर पांडुरंग गुल्हाने हे मलेरिया डॉक्टर म्हणून शासन सेवेत कार्यरत होते त्यांच्या जाण्याने भागवत धर्माच्या प्रचार कार्याला क्षती पोहोचल्याचे भागवत धर्म विस्तारकांनी आपल्या श्रद्धांजली वचनात कळवलेले आहे.