Post Views: 457
प्रतिनिधी सुनिल बटवाल/प्रतिनिधी
चिंबळी दि ३०(वार्ताहर) गोलेगाव (ता खेड) येथील विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थेची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध निवड झाली असल्याचे माहीती निवडणूक निर्णय अधिकारी जे बी मुलानी व संस्थेचे सचिव राजू लांडगे यांनी सांगितले .
आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व सभापती अरुण चौधरी यांच्या विशेष प्रयत्नातुन गोलेगाव येथील विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थेची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध निवड झाली असुन यामध्ये सर्व साधारण खातेदार कर्जदार प्रतिनिधी मध्ये हरिश्चंद्र चौधरी दत्तात्रय चौधरी दुर्योधन चौधरी मारूती चौधरी गोविंद चौधरी सत्यवान चौधरी संतोष चौधरी राहुल चौधरी तर अनुसूचित जाती/ जमाती प्रतिनिधी मध्ये रमेश सोनवणे महिला प्रतिनिधी मध्ये शांताबाई चौधरी तान्हुबाई घाडगे इतर मागासवर्गीय प्रतिनिधी मध्ये ज्ञानेश्वर चौधरी यांची बिनविरोध निवड झाली असुन भटक्या विमुक्त जाती/जमाती/विशेष मागास प्रवर्ग प्रतिनिधी रिक्त आहेत
या सर्व विजयी झालेल्या संचालक मंडळांचे आमदार दिलीप मोहिते पाटील व सभापती अरुण चौधरी यांनी खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे वतिने तसेच गोलेगाव पिपळगाव मरकळ ग्रामपंचायतीच्या व ग्रामस्थांच्या वतीने अभिनंदन केले