चिंबळी ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणूकीत आईच्या पाठोपाठ मुलगाही निवडून आला

प्रतिनिधी सुनिल बटवाल/चिंबळी

चिंबळी दि२२( वार्ताहर) (ता.खेड) येथील ग्रामपंचायत वार्ड क्रमांक चारच्या पोटनिवडणूकीत सर्वसाधारण पुरुष जागेवर अनुराग संजय जैद पाटील यांची बहुमतांनी निवड झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी रामचंद्र बारवे यांनी दिली.सहायक निवडणूक अधिकारी म्हणून बलभीम पाटील यांनी काम पाहिले.एकूण ५२१ मतदारांनी मतदानाचा अधिकार बजवला होता त्यापैकी अनुराग संजय जैद यांना २८३ मते तर अभिजित विजय जगनाडे यांना २३२ मते मिळाली ६ मतदारांनी नोटाचा पर्याय निवडला.अनुराग जैद हे ५१ मतांनी विजयी झाले.

खेड तालुक्याचे कार्यसम्राट आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली माजी सभापती विलास कातोरे यांच्या विशेष प्रयत्नातुन पहिल्यांदाच आई व मुलगा ग्रामपंचायत निवडणूकीत विजयी झाले आहेत.


   विजयी उमेदवार अनुराग जैद,बाजार समितीचे माजी सभापती विलास कातोरे यांच्या हस्ते बाजार समिती आवारातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत अभिवादन करण्यात आले.यावेळी कार्यकर्त्यांनी भंडारा उधळत विजयाचा जल्लोष साजरा करण्यात आला.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व कार्यकर्ते,पदाधिकारी,ग्रामस्थ उपस्थित होते. तसेच विजयी फेरी चिंबळी परिसरात ही मोठ्या आनंदमय वातावरणात वाजंत्री ताफा व फटाक्यांची आतषबाजी करत मोठ्या जल्लोषात काढण्यात आली 
.

चिंबळी ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणूकीत आईच्या पाठोपाठ मुलगाही निवडून आला असून गावच्या राजकीय इतिहासात पहिल्यांदाच आई व मुलाची जोडी ग्रामपंचायत कारभारात योगदान देणार आहे.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!