भारतीय महाविद्यालयात माती परीक्षण कार्यशाळा संपन्न

अमरावती – महेश बुंदे

भारतीय विद्यामंदिर अमरावती द्वारा संचालित भारतीय महाविद्यालय अमरावती व राष्ट्रीय विज्ञान अकादमी, भारत मुंबई चॅप्टर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘नफ्यासाठी शेती – माती परीक्षण व सुष्मजीव संवर्धनाद्वारे जमीन सुधार ‘या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा दिनांक १ जानेवारी २०२२ रोजी संपन्न झाली.

या कार्यशाळेच्या उद्घघाटकीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. आराधना वैद्य, उद्घाटक मा. अनिल खर्चान, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी , अमरावती,
प्रमुख उपस्थिती अॅड. यदुराज मेटकर, सरचिटणीस भारतीय विद्या मंदिर,अमरावती व डॉ. दिपलक्ष्मी कुळकर्णी , संयोजन सचिव व्यासपीठावर उपस्थित होत्या. सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक, पाहुण्यांचा परिचय व कार्यशाळेच्या मागची भूमिका डॉ दिपलक्ष्मी कुळकर्णी यांनी नमूद केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. दया पांडे यांनी केले. कार्यशाळेच्या पहिल्या तांत्रिक सत्रामध्ये “माती परीक्षण आणि चांगले उत्पादन” या विषयावर प्रार्थना डिवरे , कनिष्ठ रसायनशास्त्र, भूजल सर्वेक्षण आणि विकास संस्था अमरावती यांनी मार्गदर्शन केले.

कार्यशाळेच्या दुसर्‍या तांत्रिक सत्रात ‘सुक्ष्म पोषकद्रव्ये फायदे आणि व्यवस्थापन’ या विषयावर प्रा. प्रशांत महल्ले, श्री शिवाजी कृषी महाविद्यालय यांनी मार्गदर्शन केले. कार्यशाळेच्या तिसऱ्या तांत्रिक सत्रामधे ‘ मृदा आरोग्य सुधारण्यासाठी तंत्रज्ञान आणि मातीतील सेंद्रिय कर्ब शोध संचाचे प्रात्यक्षिक’ या विषयावर डॉ.सयाजी मेहेत्रे वैज्ञानिक, NABTD,BARC ट्राम्बो मुंबई यांनी मार्गदर्शन केले.

कार्यशाळेच्या तांत्रिक चौथ्या सत्रामध्ये ‘जैविक शेतीमध्ये सुक्ष्म जीवाचे महत्व’ या विषयावर श्री. परिक्षित भांबुरकर, संचालक ,परीक्षित बायोटेक अमरावती यांनी मार्गदर्शन केले. सोबतच प्रा. संजय गुल्हाने सूक्ष्मजीवशास्त्र विभाग , भारतीय महाविद्यालय अमरावती यांनी सुक्ष्म जीव कल्चर तयार करणे व ऊपयेाग’ यावर प्रात्यक्षिक दिले. सर्व तांत्रीक सत्राचे संचलन डॅा. मीना डेाईबाले यांनी केले तर
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉ.दिपलक्ष्मी कुळकर्णी यांनी केले. या कार्यशाळेसाठी अमरावती जिल्ह्यातील विविध तालुक्यातील जवळ जवळ १०० शेतकरी बांधव सहभागी झाले होते. कार्यशाळेच्या यशस्वीते साठी महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्यार्थी व शिक्षकेतर वर्गाने परिश्रम घेतले.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!