प्रतिनिधी ओम मोरे
• सविस्तर वृत्त –
पुणे वार्ता:- आज गुरुवार , दिनांक ३० डिसेंबर २०२१ रोजी, महाराष्ट्र राज्य पर्यटन व कला सांस्कृतिक महोत्सव समिती व राष्ट्रीय पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्था,भारत या आंतरराष्ट्रीय पातळीवर कार्यरत असलेल्या संघटनेच्या तृतीय वर्धापन दिनानिमित्त आयोजित राष्ट्रीय पर्यावरण व पर्यटन अधिवेशन – २०२१ , आकुर्डी,पुणे येथील सभागृहात मोठ्या उत्साहात संपन्न झाले.
सदर अधिवेशन हे पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्था,भारत संस्थेचे संस्थापक श्री देवा तांबे यांच्या अध्यक्षतेखाली संस्थेच्या पुणे जिल्हा शाखेच्या महिला अध्यक्षा मा.अंजू सोनवणे व जिल्हा पदाधिकारी कार्यकारिणी व सदस्य यांच्या अयोजनातून संपन्न झाले.
या भव्य पर्यावरण संमेलनास प्रमुख पाहुणे म्हणून मा. रंगनाथ जी नाईकडे,IFS वनसंरक्षक,सामाजिक वनीकरण,महाराष्ट्र राज्य,मा.उमाजीबिसेन,अध्यक्ष,महाराष्ट्र राज्य पर्यटन व कला सांस्कृतिक महोत्सव समिती,मा.हभप.पुरुषोत्तम महाराज हिंगणकर,राष्ट्रीय प्रवक्ते,विश्व वारकरी सेना,महाराष्ट्र राज्य,हभप. विठ्ठल महाराज शिंदे,अध्यक्ष,इंद्रायणी सेवा फौंडेशन,आळंदी,पुणे,संस्थेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष श्री.देवा तांबे, सचिव मा.दिपक काळे,आदी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात संमेलनाचे अध्यक्ष मा.हभप.पुरुषोत्तम महाराज हिंगणकर तसेच प्रमुख मार्गदर्शक मा.रंगनाथ जी नाईकडे यांच्या हस्ते जलपूजन व वृक्ष पूजन करून करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात उत्कृष्ट गायक हभप. लटपटे महाराज व भजनी मंडळ टीम यांच्या सुंदर आवाजातील भजन गायनाने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. यावेळी उपस्थित पर्यावरण व पर्यटन प्रेमींना मा.रंगनाथ जी नाईकडे यांनी वृक्ष लागवड व त्यांचे संरक्षण यावर अमूल्य मार्गदर्शन केले.

तसेच संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष मा.उमाजी बिसेन यांनी महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास काळाची गरज याबाबत मत व्यक्त करीत उपस्थितांना मार्गदर्शन केले.
या राष्ट्रीय पर्यावरण व पर्यटन अधिवेनाचे औचित्य साधून संघटनेच्या वतीने शाळेतील विद्यार्थ्यांच्या मनामध्ये पर्यावरण संरक्षण विषयी आवड व जागरूकता निर्माण व्हावी म्हणून पर्यावरण निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, घोषवाक्य स्पर्धा इत्यादी वेगवेगळ्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांना प्रथम, द्वितीय,तृतीय तसेच सहभागी सन्मानपत्र तसेच सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
