पुणे-ओम मोरे
ग्रीन फाऊंडेशन शाखा लोणी काळभोर यांच्या वतीने आदर्श समाजसेवक दादासाहेब कटके यांच्या
वाढदिवसानिमित्त ग्रीन ऑक्सिजन पाईट येथे वड,पिंपळ, कडुनिंब, करंज, चिंच, आंबा, खैर, अशा विविध प्रकारचे वृक्ष लावून वाढदिवस साजरा करण्यात आला .
दिवसेंदिवस पर्यावरणाचा समतोल बिघडत असून मोठय़ा प्रमाणावर होत असलेली वृक्षतोड, जंगलांचा नाश या सर्व बाबी त्यासाठी कारणीभूत आहेत. पर्यावरणाच्या बिघडलेल्या समतोलामुळे अनियमित व अपूर्ण पर्जन्यमान, भयानक उष्णता अशा संकटांना तोंड देणे भाग पडत आहे. यावर प्रभावीपणे मात करायची असल्यास काळाची गरज ओळखून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी मोठय़ा प्रमाणावर वृक्षारोपण व त्याचे संवर्धन करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन ग्रीन फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष अमित जगताप यांनी केले .

या वेळी ग्रीन फाऊंडेशन हवेली तालुका संपर्क प्रमुख विनोद यादव ,जीवन जाधव, बिरूदेव भास्कर, अभिषेक शेंडगे, पंकज सुर्वे, निरक बिका,उपस्थित होते.
दादासाहेब कटके पाटील
एका अश्या समाजसेवकाचे नाव आहे
ज्यांनी वयाच्या चौदाव्या वर्षी समाजसेवा चालू केले वय लहान पण किर्ती महान असे म्हणतात ते खरच दादासाहेब हे इलेक्ट्रॉनिक चे आवघ्या चौदा वय असताना सर्व कामे शिकले.कामे येऊ लागल्यावर लोणी काळभोर कदम वाक वस्ती येथे दादाच्या कामाची चर्चा होऊ लागली गरिबीची मोफत कामे करून देणारे म्हणून ओळख निर्माण झाली .
रात्र असो किवा दिवस गोरगरिबांच्या मदतीला धावणारा दादासाहेब कटके यांना कोणाचा घरगुती इलेक्ट्रॉनिक प्रोब्लेम झाला तर अपरात्री फोन किवा घरी येऊन घेऊन जात , पण दादासाहेब कधीही गरीब नागरिकांकडून मोफत कामे करीत आहेत .दादासाहेब यांचे कार्य १८ वर्ष ते आपले कार्य लोणी काळभोर परिसरात करत आहेत त्यांच्या कार्याला ग्रीन फाऊंडेशन कडून सलाम.
