राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष प्रा. डॉ. सुशील गावंडे यांचे प्रतिपादन
दर्यापूर – महेश बुंदे
बूथ नियोजन व महत्व” या विषयावर राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हा अध्यक्ष प्रा. डॉ. सुशील गावंडे यांनी उद्बोधन केले. यावेळी पदाधिकारी व कार्यकर्ते यांना बूथ नियोजन कशा पद्धतीने करायचे याचे सविस्तर विवेचन केले. बूथ नियोजनातून सर्वसामान्यांपर्यंत शासकीय योजना पोचविण्यासाठी मदत होते व त्यांच्या अडचणी दिसून येतात, कोणत्याही राजकीय पक्षाने बूथ फक्त निवडणुकीत लोकांचे मत घेण्यासाठी नसून लोक कल्याणकारी योजना लोकाभिमुख करण्याचे माध्यम आहे, बूथ जिंकले तरच निवडणूक जिंकता येणार.
संघटनेत बूथचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. या सर्व मार्गदर्शनामुळे पदाधिकाऱ्यांना सकारात्मक ऊर्जा मिळाली. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रा.डॉ. सुशिल गावंडे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष गजानन जऊळकर, जिल्हा सरचिटणीस किरण अरबट, तालुका अध्यक्ष नितिन गावंडे, शहराध्यक्ष कपिल पोटे, शहर उपाध्यक्ष जावेद शेख, शहर उपाध्यक्ष रोहित इंगळे, शहर सरचिटणीस हर्षल खाडे, विद्यार्थी शहराध्यक्ष प्रतीक नाकट, शहर सरचिटणीस गोपाल ठाकूर, शहर सरचिटणीस अश्फाक भाई, वार्ड प्रमुख विशाल लोथे, बूथ प्रमुख तथा शहर प्रसिद्धी प्रमुख प्रथमेश रायपुरे, वार्ड प्रमुख सौरभ देशमुख, वार्ड प्रमुख वृषभ ठाकूर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे ग्रामीण उपाध्यक्ष शफान पटेल , पिंपळोड पंचायत समिती प्रमुख जय टेकाडे, तालुका सरचिटणीस प्रशांत धानोरकर , शहर सरचिटणीस वृषभ कुटाफळे, तालुका सरचिटणीस सागर काळे , बूथ प्रमुख अरबाज खान उपस्थित होते.