बातमी संकलन – महेश बुंदे
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ संलग्नित भारतीय विद्या मंदिर अमरावतीद्वारा संचालित भारतीय महाविद्यालय अमरावती येथे एड्स जनजागृती कार्यशाळा व प्रश्नमंजुषा कार्यक्रम संपन्न झाला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.आराधना वैद्य, कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते मा. शमी शेख, कार्यक्रम अधिकारी, साथी प्रकल्प, मुंबई. प्रमुख उपस्थिती प्रा.निलेश कडू, जिल्हा समन्वयक, राष्ट्रीय सेवा योजना संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती डॉ.सुमेध आहाटे, प्रा. पंडित काळे, डॉ. प्रशांत विघे, कार्यक्रम अधिकारी, राष्ट्रीय सेवा योजना डॉ. पल्लवी सिंग, सह-महिला कार्यक्रम अधिकारीव्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमाचे वक्ते शमी शेख म्हणाले की, एच आय व्ही-एड्स या आजाराबद्दल महाविद्यालयीन जीवनापासूनच विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती होणे गरजेचे आहे.
जर महाविद्यालयातील विद्यार्थी चुकीच्या पद्धतीने चुकीच्या मार्गाने गेला नाही तर एच.आय.व्ही-एड्स या आजारापासून वाचू शकतो असे प्रतिपादन केले. या कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांसाठी एच.आय.व्ही-एड्स या विषयावर प्रश्न-मंजुषाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
