वृध्द मातेस वाऱ्यावर सोडुन तिचा परित्याग करणाऱ्या मुलावर गुन्हा दाखल

प्रतिनिधी फुलचंद भगत

वाशिम:-पो.स्टे कारंजा शहर दिनांक 26/12/2021 रोजी फिर्यादी नामे श्रीमती नर्मदादेवी रामकूमार शर्मा वय 85 वर्ष व्यवसाय -काहीच नाही रा.नेहरू चौक छञपती शिवाजी महाराज यांचे पूतळ्या जवळ कारंजा ता.कारंजा (लाड) जि वाशिम यांनी पोलीस स्टेशन येथे हजर येवून जबानि रिपोर्ट दिला की त्या नमूद पत्यावर राहत असुन त्यांना अनेक व्याधी आहेत त्याच्या उदरर्निवाहाचे कोणतेही साधन नसुन त्यांचे पती श्री.रामकूमारजी शर्मा हे सन 2000 मध्ये मरण पावले असून नमुद फिर्यादी चा मोठा मूलगा नामे बालमुकुंद रामकूमारजी शर्मा अकोला याने सर्व संपत्ती त्याचे नावे करून अकोला येथे निघून गेला त्यानंतर त्याने फिर्यादीस आजपर्यंत विचारपूस केले नाही
तसेच घरात सूध्दा आसरा दिला नाही.

फिर्यादीस आता मानसिक,शारीरीक व्याधीचा त्रास असून तीला हालचाल करता येत नाही. मोठा मूलगा पालन पोषणाची जबाबदारी घेत नसल्याने व त्याचे घरात राहू देत नसल्याने अशा फिर्यादीचे जबानि रिपोर्ट वरुन पो.स्टे कारंजा शहर येथे अपराध क्र.889/21 कलम 24 जेष्ठ नागरिक आणि पालक यांचे पालनपोषण आणि कल्याण अधिनियम 2007 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्ह्याचा तपास पो.नी.आधारसिंग.एस.सोनोने पोलीस स्टेशन कारंजा शहर यांचे मार्गदर्शनाखाली सपोनी प्रशांत जाधव,पोहेकाँ/04 चरणसिंग चव्हाण करित आहेत.अशा प्रकारे कोणत्या वृध्द माता-पित्यास त्यांच्या पाल्याकडुन त्यांचा सांभाळ होत नसल्यास किंवा पाल्याने त्याचा परित्याग केला असल्यास त्यांनी पोलीस स्टेशन कारंजा शहर येथे येवुन तक्रार नोंदवावी.करिता पो.स्टे.कडुन आव्हान करण्यात आले आहे.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!